Tamil Nadu: तंजावरमध्ये भीषण दुर्घटना! मंदिरात मिरवणुकीदरम्यान करंट लागून 11 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
Temple acciden : तामिळनाडूच्या तंजावरमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. इथल्या एका मंदिरात मिरवणुकीदरम्यान करंट लागून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन बालकांचा देखील समावेश आहे.
Temple accident in Thanjavur : तामिळनाडूच्या तंजावरमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. इथल्या एका मंदिरात मिरवणुकीदरम्यान करंट लागून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन बालकांचा देखील समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार तंजावरमधील मंदिरात एका रथयात्रेदरम्यान ही दुर्घटना घडली. रथयात्रा सुरु असताना वीजेच्या तारेला स्पर्श झाल्यानं ही घटना घडली. अवघ्या क्षणात होत्याचं नव्हतं झालं अन् 11 भाविकांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले असल्याची देखील माहिती आहे.
Tamil Nadu | At least 10 people died after a temple car (of chariot festival) came in contact with a live wire in the Thanjavur district. More details are awaited. pic.twitter.com/clhjADE6J3
— ANI (@ANI) April 27, 2022
माहितीनुसार या दुर्घटनेत अनेक भाविक गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्याला सुरुवात केली.
#WATCH | At least 10 people died after a temple car (of chariot festival) came in contact with a live wire in the Thanjavur district in Tamil Nadu pic.twitter.com/F4EdBYb1gV
— ANI (@ANI) April 27, 2022
मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश
माहितीनुसार या मंदिरामध्ये 94 वा अप्पर गुरु पूजा उत्सवाचा कार्यक्रम सुरु होता. या उत्सवासाठी मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी झाली होती. रस्त्यावर पारंपारिक रथ यात्रेच्या वेळी एका वीजेच्या तारेला रथाचा स्पर्श झाला. यामुळं करंट उतरुन 11 जणांचा मृत्यू झाला. यात 2 लहान मुलांचा देखील समावेश आहे. या दुर्देवी घटनेनं तामिळनाडूसह देशभरात खळबळ उडाली आहे.
#UPDATE | As of now, 10 people died & 15 others suffered injuries after a temple car (of chariot festival) came in contact with a live wire in the Thanjavur district. FIR was registered in the matter: V Balakrishnan, Inspector General of Police, Central Zone, Tiruchirappalli pic.twitter.com/oM5YBGcyE6
— ANI (@ANI) April 27, 2022