Telangana Naxals Encounter : तेलंगणा-छत्तीसगडच्या सीमेवर नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत सहा नक्षलवादी मारले गेलेत. तेलंगणा पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. तेलंगणाच्या कोत्तागुडमचे पोलीस अधीक्षक सुनील दत्त यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. चकमकीनंतर पोलिसांनी तातडीनं शोधमोहीम राबवली. त्यात घटनास्थळी सहा नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले असून मोठ्या प्रमाणात हत्यारंही जप्त करण्यात आली आहेत. तेलंगणाचे कोट्टागुडम एसपी सुनील दत्त यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. सध्या घटनास्थळी शोधमोहीम सुरु आहे.


किस्तराम पीएस सीमेवरील जंगलात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. एसपी सुनील दत्त यांनी म्हटलं की, हे तेलंगणा पोलीस, छत्तीसगढ पोलीस आणि सीआरपीएफ यांचं जॉईंट ऑपरेशन होतं. सकाळी 10.30 वाजता हे ऑपरेशन सुरु झालं होतं. घटनास्थळी शोधमोहीम सुरु असून पोलिसांकडून लगतच्या भागांत गस्त घालण्यात येत आहे. 


तेलंगणा ग्रेहाऊंड्स आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. छत्तीसगढच्या नारायणपूर जिल्ह्यामध्ये दोन आयईडी मिळाल्यानंतर एन्काउंटर झाला. जिल्ह्यातील सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी हे आयईडी प्लांट बनवण्यात आले होते. अहवालानुसार, नक्षलवादी आयईडीद्वारे सुरक्षा दलांना लक्ष्य करत आहेत, कारण त्यांना बस्तर आणि अबुजमाद भागातील स्थानिक लोकांचा पाठिंबा फारसा मिळत नाहीये. गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.


याआधी गुरुवारी झारखंडमधील चाईबासा जिल्ह्यात पोलिसांनी पीपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडिया (PLFI)चा 'एरिया कमांडर' बंधन टोप्नो याला सोगा टेकडीच्या जंगलातून शस्त्रास्त्रांसह अटक केली होती.


पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईमध्ये नक्षली कमांडरसोबत त्यांच्या काही साथीदारांचाही पाठलाग करण्यात आला. परंतु, त्यांनी त्याठिकाणाहून पळ काढला. अटक करण्यात आलेल्या नक्षली कमांडरवर अनेक गुन्हे दाखल आहेत. अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांकडून पोलिसांनी एक रायफल, गोळ्या आणि इतर दारूगोळा जप्त केला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह