Omicron in India Latest Update : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus) घातक व्हेरियंट ओमायक्रॉननं (Omicron Variant) धाकधुक वाढवली आहे. देशात आतापर्यंत या व्हेरियंटमुळं 19 राज्यात 578 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, 151 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, या व्हेरियंटमुळं आतापर्यंत देशात एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही. जाणून घ्या ओमायक्रॉन व्हेरियंटची देशातील सध्याची स्थिती...  

देशात ओमायक्रॉन व्हेरियंटची सद्यस्थिती

एकूण रुग्ण : 578
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : 151
एकूण राज्य : 19

कोणत्या राज्यात किती लोकांना संसर्ग : 

शहरं  ओमायक्रॉनबाधित ओमायक्रॉनमुक्त रुग्ण 
दिल्ली 142 23
महाराष्ट्र  141 42
केरळ 57 01
गुजरात  49 10
राजस्थान 43 30
तेलंगाना  41 10
तामिळनाडू 34 00
कर्नाटक  31 15
मध्यप्रदेश  09 07
आंध्रप्रदेश  06 01
पश्चिम बंगाल  06 01
हरियाणा 04 02
ओदिशा  04 00
चंदिगढ 03 02
जम्मू-काश्मिर  03 03
उत्तर प्रदेश  02 02
हिमाचल 01 01
लडाख  01 01
उत्तराखंड  01 00

निवडणूक प्रचारसभांचे काय होणार? आरोग्य मंत्रालय आणि निवडणूक आयोगाची आज बैठक

देशात एका बाजूला ओमायक्रॉनचा धोका वाढत असताना दुसरीकडे पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचारसभा सुरू आहेत. या सभांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळत असून कोव्हिड प्रोटोकॉलचे उल्लंघन होत आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून अधिकाधिक गर्दीच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे ओमायक्रॉनच्या संसर्गाचा धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने एक महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत केंद्रीय आरोग्य सचिवदेखील सहभागी होणार आहे. ओमायक्रॉनचा धोका, विषाणूचे स्वरुप आदींबाबत आरोग्य विभाग निवडणूक आयोगाला माहिती देणार आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाला आरोग्य सचिवांकडून ओमिक्रॉनचा वाढता धोका आणि त्याच्याशी संबंधित सर्व माहिती जाणून घ्यायची आहे. ओमायक्रॉन किती धोकादायक आहे आणि ते टाळण्यासाठी काही उपाय काय आहेत हे आरोग्य मंत्रालयाकडून जाणून घ्यायचे आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा