एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'तिस्ता सेटलवाडांनी दंगलग्रस्तांचे 3.85 कोटी स्वत:साठी वापरले', पोलिसांचा आरोप
अहमदाबाद: सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड आणि त्यांचे पती आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. तिस्ता सेटलवाड यांच्या एनजीओला 2002 साली झालेल्या गुजरात दंगल पीडितांसाठी 9.75 कोटी रुपये मिळाले होते. ज्यामधील 3.85 कोटी या दाम्पत्यानं स्वत:साठी वापरले असल्याचा दावा गुजरात पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी आपल्याकडे सबळ पुरावे असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे.
इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, 83 पानाच्या प्रतिज्ञापत्रात असं म्हटलं आहे. तिस्ता सेटलवाड त्यांचे पती जावेद आनंद आणि त्यांची एनजीओ (सेंटर फॉर जस्टिस अॅण्ड पीस - सीजेपी) यांच्याकडून याप्रकरणी चौकशीत सहकार्य मिळत नसल्याचं म्हटलं आहे.
गुजरात पोलिसांनी याप्रकरणी, सीजेपी तिस्ता आणि त्यांचे पती जावेद आनंद यांच्या 2007 ते 2014मधील बँक खात्यांची तपासणी केली. पोलिसांनी सांगितलं की, या दाम्पत्याच्या मुंबईतील एका बँक खात्यात 31 डिसेंबर 2002 पर्यंत कोणतीच रक्कम जमा नव्हती. पण जानेवारी 2003 ते डिसेंबर 2013 मध्ये आनंद यांनी 96.43 लाख आणि तिस्ता यांनी 1.53 कोटी रुपये जमा केले. याशिवाय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून फेब्रुवारी 2011 ते जुलै 2012 मध्ये मिळालेलं अनुदानातून या दाम्पत्यांना 1.40 कोटी स्वत: साठी वापरले आहेत.
अनेक दंगल पीडितांचे खटले आपण मोफत लढविले असल्याचं सेटलवाड यांचं म्हणणं देखील खोटं आहे. अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे. कागदपत्रांच्या आधारे असा खुलासा झाला आहे की, अनेक वकिलांना फीच्या स्वरुपात 71 लाख आतापर्यंत देण्यात आले आहेत.
दरम्यान, गुजरात हायकोर्टानं त्यांची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली होती. मात्र, सुप्रीम कोर्टानं त्यांच्या अटकेला स्थगिती दिली आहे. दुसरीकडे तिस्ता सेटलवाड यांनी गुजरात पोलिसांविरोधात तक्रार करण्यासाठी मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली आहे. पोलीस आपल्यावर सूड भावनेतून ही कारवाई करीत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement