एक्स्प्लोर

CM Bhagwant Mann : पंजाबचे शिक्षक शिकवण्याशिवाय दुसरे काम करणार नाहीत, भगवंत मान यांची घोषणा

CM Bhagwant Mann : पंजाबचे शिक्षक (Teachers in Punjab) शिकवण्याशिवाय दुसरे कोणतेही काम करणार नसल्याची घोषणा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (CM Bhagwant Mann) यांनी केली आहे.

CM Bhagwant Mann : पंजाबचे शिक्षक (Teachers in Punjab) शिकवण्याशिवाय दुसरे कोणतेही काम करणार नसल्याची घोषणा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (CM Bhagwant Mann) यांनी केली आहे. निवडणूक आयोगानं (Election commission) नुकतीच आमच्याकडे जनगणनेसाठी 68 हजार शिक्षकांची मागणी केली होती. पण तुम्हाला शिक्षक दिले तर विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? असा सवाल आम्ही उपस्थित करत आम्ही जनगणनेच्या कामाला शिक्षकांना लावण्यास  नकार दिल्याचे मान यांनी सांगितले. राज्यात शिक्षकांची दिली जाणारी शिक्षणबाह्य कामे बंद करावी ही मान यांची प्रमुख मागणी आहे. 

महाराष्ट्रातही अशैक्षणिक कामांना शिक्षक संघटनांचा विरोध

अनेकदा सरकारी अधिकार्‍यांकडून शिक्षकांना शाळेबाहेरील अशैक्षणिक कामे (Non-Teaching Duties) दिली जातात. यामुळे सरकारी शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात देखील ही स्थिती आहे. शिक्षकांना जनगणना, निवडणूक मतदार नोंदणी यासारखी 100 हून अधिक प्रकारची कामे करावी लागतात. त्यामुळं शिक्षकांवरील अतिरीक्त कामाचा ताण कमी करावी अशी मागणी करण्यात येत आहे. शिक्षक आणि त्यांना दिली जाणारी अशैक्षणिक कामे हा अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला विषय आहे. राज्य शासनाकडून शिक्षकांवर अशी कामे लादली जातात. शिक्षक संघटना त्यास विरोध करतात. अशैक्षणिक कामांवर बहिष्कार टाकतात, काही वेळा शासन निर्णय बदलते किंवा काही वेळा सक्तीने अशी कामे शिक्षकांना करावीच लागतात. एकूणच काय तर शाळेत शिकविणे, मुलांना घडविणे यापेक्षा शिक्षकांवर अनेक अशैक्षणिक कामे लादली जातात.  शिक्षकांवर शालाबाह्य कामांचा भार नेहमीच अधिक असतो.

शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिली जाणार नाहीत, असे परिपत्रकही शासनाने 2013 मध्ये काढले होते. त्यावेळी शिक्षकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता. किमान यापुढे तरी विद्यार्थ्यांना शाळेत वेळ देता येईल आणि मुलांचा विकास होऊ शकेल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र, शासनाचा हा निर्णय फार काळ टिकला नाही. काही दिवसांतच निर्णय बदलत शिक्षकांना अशैक्षणिक कामे करावीच लागतील असे परिपत्रक काढण्यात आले. शिक्षकांना जनगणना, आपत्ती निवारण, निवडणूक, सर्वेक्षण अशी विविध अशैक्षणिक कामे करणेही भाग पडते. शिक्षकांना देण्यात येणाऱ्या कामांमध्ये शिष्यवृत्ती योजनांचे तपशील लिहणे, लसीकरण मोहिम राबवणे, सरकारी खात्यातील विभागांना मदत करणे यासारखी कामांचाही समावेश आहे. 

Punjab Teachers : पंजाबचे 36 मुख्याध्यापकांनी सिंगापूरमध्ये घेतलं प्रशिक्षण 

सिंगापूरमधील शिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात पंजाबचे 36 मुख्याध्यापक सहभागी झाले होते. ते शनिवारी देशात परतले. त्या शिक्षकांनी देशाची राजधानी दिल्लीत आपले अनुभव सांगितले. या कार्यक्रमाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तसेच पंजाबचे शिक्षणमंत्री हरजोस बैंस उपस्थित होते. यावेळी मान बोलत होते. दिल्ली आणि पंजाबच्या शिक्षण विभागाशी संबंधित उच्चपदस्थ अधिकारीही कार्यक्रमाला उपस्थित होते. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू शाळेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 

Singapore Education : सिंगापूरमध्ये शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व

शिक्षकांना सिंगापूर येथील प्रिन्सिपल अकॅडमी इंटरनॅशनल येथे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना पाच दिवसांचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. जगातील विकसित देशांतील शिक्षक येथे प्रशिक्षणासाठी जातात. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक आहेत. ज्यांना शैक्षणिक उपक्रमांचा व्यापक अनुभव आहे. या प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांना स्थानिक शाळांना भेट देण्याचीही संधी मिळाली. सिंगापूरमध्ये शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. सिंगापूरचे शिक्षण क्षेत्रात खूप नाव आहे, त्यामुळं जगभरातून शिक्षक तिथे प्रशिक्षणासाठी जातात. सिंगापूरमध्ये शिक्षकांना स्वायत्तता आहे. तिथली प्रत्येक शाळा वेगळी असते. प्रत्येक शाळेची स्वतःची दृष्टी असते. तेथील काही शाळा AI च्या क्षेत्रातील शिक्षण देत आहेत.

CM Arvind Kejriwal : आमच्या सरकाराचं शिक्षणाला प्राधान्य

आत्तापर्यंत कोणत्याही राज्याने शिक्षकांना प्रशिक्षणासाठी परदेशात पाठवले नसल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले. शिक्षकांना प्रशिक्षणासाठी पाठवून आमचं सरकार हाच संदेश देत आहे की शिक्षणाला आमचे प्राधान्य आहे. पंजाबचे शिक्षणमंत्री गेल्या वर्षभरात परदेशात गेले नाहीत, मात्र मुख्याध्यापकांनी परदेशातून प्रशिक्षण आणल्याचे मान म्हणाले. आता 36 मुख्याध्यापक गेले होते.  

महत्त्वाच्या बातम्या:

एकवेळ आमदार असो की दहावेळा, पेन्शन एकाच टर्मची मिळणार; पंजाबमध्ये भगवंत मान यांचा षटकार

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
CAG Report: रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
Embed widget