Tamil Nadu Helicopter Crash : बुधवारी सकाळी तामिळनाडूतील कन्नूरमध्ये हवाई दलाचं एक हेलिकॉप्टर क्रॅश झालं. ज्यामध्ये देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टर 14 जण होते. त्यापैकी केवळ एक ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे बचावले आहेत. ते गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, हेलिकॉप्टर अपघाताला बळी पडण्याची ही बिपीन रावत यांची पहिली वेळ नाही, 2015 मध्ये ते हलिकॉप्टर क्रॅशमधून थोडक्यात बचावले होते. 


नागालँडच्या दीमापूरमध्ये झाला होता अपघात 


ही घटना 3 फेब्रुवारी 2015 मध्ये झाली आहे. तेव्हा बिपीन रावत लेफ्टिनेंट जनरल पदावर होते. जेव्हा ही दुर्घटना घडली होती, त्यावेळी बिपीन रावत सैन्याच्या नागालँडमधील दिमापूर येथील 3-कोअरच्या हेडक्वॉर्टरचे प्रमुख होते. दिमापूरहून रावत आपल्या चीता हेलिकॉप्टरमधून रवाना झाले होते. परंतु, हेलिकॉप्टर काही उंचीवर झेपावताच क्षणी नियंत्रण सुटलं आणि हेलिकॉप्टर क्रॅश झालं. पण त्यावेळी त्यांनी काळावर मात केली होती. या दुर्घटनेतून ते सुखरुप बचावले होते. 


2015 मध्ये झालेल्या हेलिकॉप्टर क्रॅशबाबत सांगताना सैन्य दलानं म्हटलं होतं की, हेलिकॉप्टरनं जमिनीवरुन उड्डाण भरल्यानंतर काही मीटर उंचीवर जाताच हेलिकॉप्टरचं इंजिन फेल झालं होतं. परंतु, या क्रॅशमध्ये कोणाचाही मृत्यू झाला नव्हता. हवाई दलानं या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली होती. 


पाहा व्हिडीओ : 'लष्करच नव्हे,संपूर्ण देशानं युद्धासाठी तयार असावं',सडेतोड भूमिका घेणारे बिपीन रावत



 

हेलिकॉप्टर दुर्घटनेत बिपीन रावत यांचा मृत्यू 


लष्कराच्या बड्या अधिकाऱ्यांना घेऊन  हवाई दलाचं IAF Mi-17V5 हेलिकॉप्टर कर्नाटक-तामिळनाडू सीमेवरील कुन्नूरकडे जात होतं. यामध्ये सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी, त्यांचा स्टाफसह भारतीय सैन्यदलातील बडे अधिकारी होते. जवळपास 14 जण या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते.  मात्र दुपारी साडेबाराच्या सुमारास खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं. या दुर्घटनेत देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टर 14 जण होते. त्यापैकी केवळ एक ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे बचावले आहेत. ते गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.


प्राथमिक माहितीनुसार, बिपीन रावत हे आपल्या पत्नीसह वेलिंगटन इथे एका कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत लष्कराचे वरिष्ठ अधिकारीही सोबत होते. वेलिंगटनमध्ये आर्मीचं कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये सीडीएस बिपीन रावत यांचं लेक्चर नियोजित होतं.  वेलिंगटनवरुन कुन्नूरला जाताना हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहा एबीपी माझा युट्यूब लाईव्ह