CDS Bipin Rawat Death: तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावणारे देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्या पार्थिव देहावर शुक्रवारी 10 डिसेंबर रोजी दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये अंत्यसंस्कार केले जातील. जनरल जनरल रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांचं पार्थिव आज मिलिट्री विमानानं दिल्लीला आणलं जाणार आहे. शुक्रवारी जनरल रावत यांचं पार्थिव दर्शनासाठी ठेवलं जाईल. सकाळी 11 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांच्या पार्थिवाला सलामी देण्यासाठी ठेवलं जाईल. त्यानंतर त्यांच्या अंतिम संस्काराची तयारी केली जाणार आहे. दिल्लीच्या कॅन्टॉन्मेंटमधील ब्रार स्क्वायर स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडतील. 

कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर कुन्नूरजवळ हवाईदलाच्या अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या IAF MI 17 हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांच्यासह 14 जणांचा मृत्यू झाला. 


बिपीन रावत यांना दोन मुली


बिपीन रावत आणि मधुलिका रावत  यांना दोन मुली आहे. एका मुलीचे नाव कृतिका रावत आहे. बिपिन रावत यांचे वडील लक्ष्मण सिंह देखील सैन्य दलात होते. 


कोण होते सीडीएस जनरल बिपीन रावत



  • 2016 साली बिपीन रावत हे लष्करप्रमुख झाले. लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग 31 डिसेंबर 2016ला सेवानिवृत्त झाले होते, त्यांच्या जागी रावत यांची नेमणूक करण्यात आली होती. 

  • बिपीन रावत हे मूळचे उत्तराखंडचे आहेत. त्यांची 1 सप्टेंबर 2016 रोजीच सेनेच्या उपप्रमुखपदी नियुक्ती झाली होती.

  • बिपीन रावत यांचे वडिलही नि. लेफ्टनंट जनरल एल एस रावत हे सेनेच्या उपप्रमुखपदावर निवृत्त झाले होते.

  • रावत हे डिसेंबर 1978 मध्ये भारतीय सैन्य अकादमीतून पासआऊट झालेले 'बेस्ट कॅडेट' ठरले. 

  • रावत यांना 'स्वार्ड ऑफ ऑनर' या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं.

  • सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल, सेना मेडल आणि विशिष्ट सेवा मेडल सारख्या अनेक पुरस्कारांनी रावत यांना गौरवण्यात आलं आहे.



संबंधित बातम्या 


Bipin Rawat Wife Death : हेलिकॉप्टर दुर्घटनेत मधुलिका रावत यांचंही निधन!


Bipin Rawat : शक्तिमान अधिकाऱ्याला देश मुकला...पण देशाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया


Madhulika Rawat : आयुष्यभर खंबीर पाठिंबा, शेवटच्या क्षणापर्यंत साथ, हेलिकॉप्टर दुर्घटनेत मधुलिका रावत यांचंही निधन!


CDS Bipin Rawat : मोदी म्हणाले, सच्चा देशभक्ताला सलाम! अमित शाह म्हणतात, तुमचं शौर्य देश विसरणार नाही