एक्स्प्लोर
Advertisement
तीन राज्यांच्या मुख्यमंत्रिपदावरुन काँग्रेसमध्ये पेच कायम
तीन राज्यात मुख्यमंत्री देण्यावरुन अजूनही काँग्रेसमध्ये संभ्रम कायम आहे.
नवी दिल्ली : तीन राज्यात मुख्यमंत्री देण्यावरुन अजूनही काँग्रेसमध्ये संभ्रम कायम आहे. दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यात बैठकांची सत्रं सुरुच आहेत. राहुल, प्रियांका आणि सोनिया गांधी यांच्यात मुख्यमंत्री देण्यावरुन वेगवेगळी मतं असल्यानं अजूनही तिन्ही राज्यांत मुख्यमंत्रीपदाच्या नावावर संभ्रम कायम आहे.
एकीकडे जनतेच्या पसंतीचा मुख्यमंत्री देण्याचा प्रयत्न असेल असं राहुल गांधींनी जाहीर केलं होतं. मात्र मध्य प्रदेशमधून कमलनाथ यांचं मुख्यमंत्रीपदासाठी नाव जवळ जवळ निश्चित झाल्यानं मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ गट आणि ज्योतिरादित्य शिंदे गट निर्माण झाले आहेत. उत्तरेत भोलेनाथ आणि मध्यप्रदेशात कमलनाथ अशा घोषणा दिल्या जात आहेत, तर ज्योतिरादित्य शिंदे समर्थकही ज्योतिरादित्य मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आक्रमक आहेत.
तिकडे राजस्थानमध्येही परिस्थिती सारखीच आहे. मुख्यमंत्रीपदासाठी अशोक गहलोत यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. मात्र सचिन पायलट यांच्या समर्थकांनीही घोषणाबाजी केली.
दुसरीकडे छत्तीसगडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भूपेश बघेल यांचं नाव निश्चित होत असताना आता टीएस सिंहदेव यांच्या समर्थकांनीही मुख्यमंत्रीपदासाठी सिंहदेव यांचा आग्रह चालवला आहे. दोन्ही गटाच्या समर्थकांनी काँग्रेस कार्यालयाबाहेर येऊन जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान या सर्व परिस्थितीत आता राहुल गांधी काय निर्णय देणार हे पाहावं लागेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement