एक्स्प्लोर

विवाहबाह्य संबंधात फक्त पुरुषालाच शिक्षा का? कायद्याची समीक्षा होणार

हा विषय गंभीर असल्याचं सांगत सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सुपूर्द केलं आहे.

नवी दिल्ली : एखाद्या विवाहित महिलेने गैर पुरुषाशी संबंध ठेवले तर त्या पुरुषाला शिक्षा का? सुप्रीम कोर्टाचं संविधान खंडपीठ यासंबंधित काद्याची समिक्षा करणार आहे. हा विषय गंभीर असल्याचं सांगत सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सुपूर्द केलं आहे. विवाहबाह्य संबंधांची परिभाषा निश्चित करणाऱ्या भा.दं.वि. कलम 497 मध्ये केवळ पुरुषांनाच शिक्षेची तरतूद आहे. एखाद्या विवाहित महिलेशी तिच्या पतीच्या इच्छेविरोधात शारीरिक संबंध ठेवल्यास पुरुषाला 5 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. मात्र महिलेवर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे हा भेदभाव करणारा कायदा असल्याचं याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे. ''महिलांना सूट देणं समानतेच्या अधिकाराविरोधात'' केरळच्या जोसेफ शाईन यांनी ही याचिका दाखल केली आहे. ''150 वर्षांपूर्वीचा हा कायदा सध्या निरर्थक आहे. हा कायदा त्यावेळी तयार करण्यात आला होता, जेव्हा महिलांची स्थिती अत्यंक कमकुवत होती. त्यामुळे विवाहबाह्य संबंधांच्या बाबतीत त्यांना पीडितांचा दर्जा देण्यात आला'', असं याचिकाकर्त्याने म्हटलं आहे. महिलांची परिस्थिती पहिल्यापेक्षा सध्या चांगली असल्याचा याचिकाकर्त्याचा दावा आहे. विवाहित महिला जर तिच्या इच्छेने गैर पुरुषाषी शारीरिक संबंध ठेवत असेल, तर फक्त त्या पुरुषालाच शिक्षा मिळू नये. महिलांना कोणत्याही कारवाईतून सूट देणं हे समानतेच्या अधिकाराविरोधात असल्याचं याचिकाकर्त्याने म्हटलं आहे. ''महिलांना संपत्तीप्रमाणे पाहू नका'' सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानेही या दाव्यांवर सहमती दर्शवली. ''फौजदारी कायद्यामध्ये लिंग आधारावर भेदभाव होत नाही. मात्र हे कलम त्याला अपवाद आहे'', असं कोर्टाने स्पष्ट केलं. पतीच्या मंजुरीने इतर पुरुषाशी संबंध ठेवल्यानंतर हे कलम लागू न होणं हे स्पष्ट करतं की महिलेला एका संपत्तीप्रमाणे पाहण्यात येतं, अशा शब्दात या तरतुदीवर कोर्टाने नाराजीही व्यक्त केली. 1971 साली कायदा आयोग आणि 2003 साली न्यायमूर्ती मलिमथ आयोगाने 497 कलमामध्ये बदल करण्याची शिफारस केली आहे. मात्र आतापर्यंत कोणत्याही सरकारने यामध्ये बदल केला नाही, असंही याचिकाकर्त्याने सांगितलं. या कलमानुसार, पती पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाची तक्रार करु शकतो, मात्र पत्नीला पतीच्या विवाहबाह्य संबंधाची तक्रार करण्याची तरतूद नाही, असाही मुद्दा कोर्टात उपस्थित करण्यात आला. हा कायदा सध्या काही ठिकाणी महिला आणि पुरुष दोघांशीही भेदभाव करतो, असंही कोर्टाने सांगितलं. यापूर्वी 1954, 2004 आणि 2008 साली झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने भा.दं.वि कलम 497 मध्ये बदल करण्याची मागणी फेटाळलेली आहे. हे निर्णय 3 आणि 4 न्यायमूर्तींच्या खंडपीठाचे होते. त्यामुळे नव्या याचिकेला 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सुपूर्द करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Australia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी जीवे मारण्याची धमकी; मेलबर्न पोलिसांकडून हाय-अलर्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी जीवे मारण्याची धमकी; मेलबर्न पोलिसांकडून हाय-अलर्ट
Crime News: पतीला खिरीतून गुंगीचे औषध देऊन गळा आवळला; बाथरुमखाली पुरुन लाद्या बसवल्या, 45 दिवसांनी भयंकर घटना कशी समोर आली?
पतीला खिरीतून गुंगीचे औषध देऊन गळा आवळला; बाथरुमखाली पुरुन लाद्या बसवल्या, 45 दिवसांनी भयंकर घटना कशी समोर आली?
Maitreya Dadashree: 'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
RSS on Ram Mandir: राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir : वरळी कोणाचा सातबारा नाही, 2029 ला महायुतीची जागा निवडून आणणार, सचिन अहिर नेमकं काय म्हणाले?
2029 ला वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार का? विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर काय म्हणाले?
Vaibhav Sooryavanshi : सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
EPFO: कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Devendra Fadanvis: CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
Bhimashankar Temple : स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
Embed widget