एक्स्प्लोर

PM Security Breach: पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षा त्रुटी प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

PM Security Breach: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत राहिलेल्या त्रुटी प्रकरणाची सुप्रीम कोर्टाने दखल घेतली आहे.

PM Security Breach: पंजाब दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरण आता आणखी तापण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा, न्या. सूर्यकांत  आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टातील आजच्या कामकाजात हे प्रकरण पहिल्या क्रमांकावर आहे.

गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजादरम्यान वरिष्ठ वकील मनिंदर सिंह यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटीची बाब सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर मांडली. सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रुटी असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. त्यावर सरन्यायाधीशांनी त्यांना न्यायालयाकडून काय हवे आहे, अशी विचारणा केली. प्रत्युत्तरात मनिंदर सिंग म्हणाले की, खटल्याशी संबंधित सर्व रेकॉर्ड भटिंडाच्या जिल्हा न्यायाधीशांकडे सुरक्षित ठेवण्याचे निर्देश द्यावेत, सुप्रीम कोर्टाने याबाबत माहिती घ्यावी आणि या सुरक्षा  त्रुटी प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश पंजाब सरकारला द्यावेत अशी मागणी केली. 

राष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुधवारी झालेल्या पंजाब दौऱ्यादरम्यान झालेल्या सुरक्षेच्या चुकीनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी चिंता व्यक्त केली. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनीदेखील या संदर्भात पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. 

केंद्रीय गृहमंत्रालयाने अहवाल मागितला

केंद्रीय गृहमंत्रालयाने पंजाब सरकारकडून या प्रकरणी अहवाल मागितला आहे. या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश गृह मंत्रालयाने दिले आहेत. 

राजकारण तापले

बुधवारी झालेल्या या प्रकरणानंतर राजकारण तापू लागले आहे. काँग्रेस-भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेसने घातपात करण्याचा कट आखला होता असा गंभीर आरोप भाजपने केला. तर, पंतप्रधानांचा दौरा रद्द करण्यामागे निदर्शकांचे कारण नसून मोदींच्या सभेतील मोकळ्या खुर्च्या आहेत असा पलटवार काँग्रेसने केला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Independence Day 2026: स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? 2026 पर्यंत लोकसंख्येत किती वाढ? 
स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? देशाच्या लोकसंख्येत 2026 पर्यंत किती वाढ?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
Embed widget