एक्स्प्लोर

भारतात एक दिवस फक्त कचऱ्याचेच ढिग दिसतील : सुप्रीम कोर्ट

एकीकडे महाराष्ट्राची पर्यटन राजधानी औरंगाबादमध्ये कचरा प्रश्न पेटला असताना, दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने याच प्रश्नावरुन दिल्ली सरकारला फटकारलं आहे. एक दिवस भारतात फक्त कचऱ्याचेच ढिग दिसतील, असं कोर्टाने मंगळवारच्या सुनावणीत म्हटलं आहे.

नवी दिल्ली : एकीकडे महाराष्ट्राची पर्यटन राजधानी औरंगाबादमध्ये कचरा प्रश्न पेटला असताना, दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने याच प्रश्नावरुन दिल्ली सरकारला फटकारलं आहे. एक दिवस भारतात फक्त कचऱ्याचेच ढिग दिसतील, असं कोर्टाने मंगळवारच्या सुनावणीत म्हटलं आहे. सध्या सुप्रीम कोर्टात दिल्लीतील कचरा प्रश्नावरुन सुनावणी सुरु आहे. गेल्या सुनावणीवेळी कोर्टाने देशभरात सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रुल्स लागू करण्याचे आदेश दिले होते. पण अद्याप कोणत्याही राज्याने यासंदर्भातील नियमावली लागू न केल्याबद्दल कोर्टाने खंत व्यक्त केली. न्यायमूर्ती मदन बील लोकूर आणि न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु होती. त्यावेळी कोर्टाने म्हटलंय की, “आम्ही सातत्याने आदेश देऊनही आजपर्यंत सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रुल्स लागू करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे, जर कचरा प्रश्नावरुन कोणीही गंभीर नसेल, तर आम्ही आदेश देऊन उपयोग काय?” असा सवालही कोर्टाने उपस्थित केला आहे. त्याशिवाय, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रुल्स लागू करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्र सरकारला आगामी तीन महिन्याचा कालावधी कोर्टाने दिला आहे. यावर सरकारी वकील कोलिन गोंजाल्विस यांनी सांगितलं की, “कोर्टाने सर्व महापालिकांना यासाठी तीन ते चार महिन्याचा अल्टीमेटम द्यावा. यानंतरही नियमांची अंमलबजावणी न झाल्यास, महापालिकांविरोधात कोर्टाचा अवमान केल्या प्रकरणी कारवाई करावी.” दरम्यान, या प्रकरणावर पुढील सुनावणी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. तोपर्यंत सर्व राज्य सरकारांना कचरा प्रश्नावर ठोस नियमावली लागू करावी लागणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कट्टर विरोधक गुलाबराव पाटील अन् नाथाभाऊंच्या भेटीगाठी; सोबत जेवण अन् अर्धा तास खलबतं; चर्चांना उधाण
कट्टर विरोधक गुलाबराव पाटील अन् नाथाभाऊंच्या भेटीगाठी; सोबत जेवण अन् अर्धा तास खलबतं; चर्चांना उधाण
शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची खिल्ली; ओमराजेंची डरकाळी, आधी यवतमाळहून आलेला वाघ पकडा
शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची खिल्ली; ओमराजेंची डरकाळी, आधी यवतमाळहून आलेला वाघ पकडा
Ravi Rana : उद्धव ठाकरे लवकरच फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना दिसतील; रवी राणांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे लवकरच फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना दिसतील; रवी राणांचा खळबळजनक दावा
Anjali Damania on Ajit Pawar : अजित पवार आणि माझा 36 चा आकडा, पण धनंजय मुंडेंविरोधात त्यांना पुरावे हवे आहेत ना? अंजली दमानियांचा मोठा निर्णय
अजित पवार आणि माझा 36 चा आकडा, पण धनंजय मुंडेंविरोधात त्यांना पुरावे हवे आहेत ना? अंजली दमानियांचा मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pratap Sarnaik : परिवहनमंत्र्यांना न विचारताच ST ची भाडेवाढ? प्रताप सरनाईकांची थेट उत्तरेDnyaneshwari Munde  Mahadev Munde  खूनातील आरोपींना अटक करणार;अंबाजोगाईचे पोलीस उपअधीक्षकांचं आश्वासनABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 24 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 27 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कट्टर विरोधक गुलाबराव पाटील अन् नाथाभाऊंच्या भेटीगाठी; सोबत जेवण अन् अर्धा तास खलबतं; चर्चांना उधाण
कट्टर विरोधक गुलाबराव पाटील अन् नाथाभाऊंच्या भेटीगाठी; सोबत जेवण अन् अर्धा तास खलबतं; चर्चांना उधाण
शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची खिल्ली; ओमराजेंची डरकाळी, आधी यवतमाळहून आलेला वाघ पकडा
शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची खिल्ली; ओमराजेंची डरकाळी, आधी यवतमाळहून आलेला वाघ पकडा
Ravi Rana : उद्धव ठाकरे लवकरच फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना दिसतील; रवी राणांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे लवकरच फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना दिसतील; रवी राणांचा खळबळजनक दावा
Anjali Damania on Ajit Pawar : अजित पवार आणि माझा 36 चा आकडा, पण धनंजय मुंडेंविरोधात त्यांना पुरावे हवे आहेत ना? अंजली दमानियांचा मोठा निर्णय
अजित पवार आणि माझा 36 चा आकडा, पण धनंजय मुंडेंविरोधात त्यांना पुरावे हवे आहेत ना? अंजली दमानियांचा मोठा निर्णय
Mahadev Munde case: महादेव मुंडेंच्या पत्नीला बीडच्या पोलीस डीवायएसपीचं मोठं आश्वासन, वाल्मिक कराडचा मुलगा मोठ्या अडचणीत सापडणार?
महादेव मुंडेंच्या पत्नीला बीडच्या पोलीस डीवायएसपीचं मोठं आश्वासन, वाल्मिक कराडचा मुलगा अडचणीत सापडणार?
Bhandara News : सनफ्लॅग कंपनीत क्रेनचा हुक अंगावर पडून दोन कामगार गंभीर; जखमींच्या नातेवाईकांकडून आंदोलनचा इशारा
सनफ्लॅग कंपनीत क्रेनचा हुक अंगावर पडून दोन कामगार गंभीर; जखमींच्या नातेवाईकांकडून आंदोलनचा इशारा, भंडाऱ्यातील घटना
Accident : पुणे बंगळूर महामार्गावर तांदूळवाडीजवळ एसटीचा अपघात; हायवेवरून कठडा तोडून खाली उतरली
पुणे बंगळूर महामार्गावर तांदूळवाडीजवळ एसटीचा अपघात; हायवेवरून कठडा तोडून खाली उतरली
मोठी बातमी! संतोष देशमुख प्रकरणात सुदर्शन घुलेविषयी महत्त्वाचे पुरावे सापडले, SIT चा बीड न्यायालयाकडे महत्त्वाचा अर्ज
मोठी बातमी! संतोष देशमुख प्रकरणात सुदर्शन घुलेविषयी महत्त्वाचे पुरावे सापडले, SIT चा बीड न्यायालयाकडे महत्त्वाचा अर्ज
Embed widget