एक्स्प्लोर

तोट्यातील 112 कोटी चलनात दाखवा, सुप्रीम कोर्टाचा आठ जिल्हा मध्यवर्ती बँकांना दिलासा

राज्यातील आठ बँकांचे एकूण 112 कोटी रुपये तोट्यात न दाखवता सध्या चलनात दाखवण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टाने केल्याने बँकांना दिलासा मिळाला आहे.

नाशिक : नाशिकसह राज्यातील आठ जिल्हा मध्यवर्ती बँकांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. तोट्यात दाखवलेले एकूण 112 कोटी रुपये सध्या चलनात दाखवण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टाने दिल्या आहेत. नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने नाशिकसह राज्यातील इतर बँकांचे आर्थिक व्यवहार गोठवले होते. कालांतराने निर्बंध उठवले, मात्र त्या काळात बँकांमध्ये जमा झालेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटांची रक्कम ही तोट्यात दाखवण्याची सूचना 'नाबार्ड'ने जिल्हा बँकांना केली होती. त्यामुळे आर्थिक अडचणीत असणाऱ्या बँकांचा पाय अधिकच खोलात गेला होता. जिल्हा बँकांनी या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी देताना न्यायालयाने राज्यातील आठ बँकांचे एकूण 112 कोटी रुपये तोट्यात न दाखवता सध्या चलनात दाखवण्याच्या सूचना केल्याने बँकांना दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्हा बँकेची 21 कोटी 35 लाख रुपयांची रक्कम बँकांच्या हातातून गेल्यात जमा होती. ती रक्कम आज बँकेच्याच खात्यात दाखविल्याने बँकेला तूर्तास दिलासा मिळाला आहे. आता पुढील सुनावणीकडे लक्ष लागलं आहे. परभणीच्या शेतकऱ्यांचीही अशीच कथा महाराष्ट्रातल्या परभणीच्या दोन शेतकऱ्यांच्या वतीनेही अशाच प्रकारची एक याचिका करण्यात आली होती. अजित यादव आणि गणेश निर्मळ अशी या दोन शेतकऱ्यांची नावं होती. परभणीच्या शेतकऱ्यांना सुप्रीम कोर्टात का जावं लागलं? नोटाबंदीदरम्यान यादव आणि निर्मळ सोयाबीनचे साडेपाच लाख रुपये घेऊन जात होते. त्यावेळी, हे पैसे निवडणूक प्रचारासाठी नेत  असल्याच्या संशयातून आयकर विभागाने त्यांना पकडलं आणि पैसे ताब्यात घेतले होते. मात्र चौकशीअंती हे पैसे सोयाबीन विक्रीचे असल्याचं सिद्ध झालं. त्यांना आयकर विभागाकडून पैसे परत मिळाले 9 जानेवारीला. मात्र तोपर्यंत 30 डिसेंबरची मुदत उलटून गेली होती. शिवाय सरकारने जेव्हा 8 नोव्हेंबरचा निर्णय जाहीर केला होता, त्यात योग्य कारण देऊन तुम्ही 30 डिसेंबरनंतरही पैसे जमा करु शकाल असं म्हटलं होतं. मात्र नंतर केवळ जे लोक परदेशात असल्याच्या कारणाने पैसे जमा करु शकले नव्हते अशाच लोकांना ही संधी मिळाली. त्यामुळे सरकारच्या नोटफिकेशनमधल्या बदलामुळे आपल्याला पैसे जमा करता आले नाहीत, असा दावा करत त्यांनी कोर्टात धाव घेतली होती.

महत्त्वाच्या बातम्या

महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Bangladesh : भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget