Supreme Court : देशातील महत्वाचे प्रश्न सोडवणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) न्याधीशांना आता वेगळी समस्या जाणवत आहेत. देशामधील अनेक भागांमध्ये माकडांची संख्या जास्त आहे. या माकडांमुळे काही लोकांना त्रास देखील होतो. दिल्लीतील (Delhi) सरकारी बंगल्यांच्या परिसरात देखील बरीच माकडं आहेत. लुटियन्स झोनमधील (Lutyens Bungalow Zone) व्हीआयपी रहिवासी, न्यायाधीश आणि त्यांच्या कुटुंबियांना अनेकदा या माकडांचा त्रास होतो. आता सुप्रिम कोर्टनं न्यायाधीशांच्या घराच्या परिसरातून माकडं हकलवण्याच्या कामासाठी इच्छूक असणाऱ्यांसाठी एक टेंडर जाहीर केले आहे.
न्यायालयाच्या प्रशासकीय विभागाने जाहीर केलेल्या टेंडरमध्ये माकडे हकलवण्याच्या कामासाठी इच्छुक संस्थांनी 24 मार्चपर्यंत प्रस्ताव पाठवावेत, असे म्हटले आहे. या कामासाठी निवडण्यात आलेल्या संस्थांना 35 ते 40 बंगल्यांसाठी हे काम करावे लागेल. न्यायाधीशांचे हे बंगले सुप्रीम कोर्टापासून तीन ते चार किलोमीटरपर्यंतच्या परिसरात आहेत. माकडे हटवण्याच्या कामासाठी निवडण्यात आलेल्या संस्थेला सुरूवातीला सहा महिने काम करावे लागेल. जर हे काम त्या संस्थेनं व्यवस्थित केले, तर या कामाचे दिवस वाढवण्यात येतील.

टेंडरमध्ये असे म्हणण्यात आले आहे की, माकडे हकलण्यासाठी निवडण्यात आलेल्या एजंन्सीला माकडे हकलण्यासाठी लोक उपलब्ध करून द्यावी लागतील. जेव्हा गरज असेल त्यावेळी त्या लोकांना माकडांना हकलवण्यासाठी बोलवण्यात येईल. '
महत्वाच्या बातम्या
- Russia Ukraine War : ट्रेनमध्ये चढलात तर गोळ्या घातल्या जातील, युक्रेन नागरिकांकडून धमकावल्याचा भारतीय विद्यार्थिनीचा दावा
- Eveready Industries : एव्हरेडी इंडस्ट्रीजच्या अध्यक्ष-एमडींचा राजीनामा, कंपनीत मोठी खळबळ
- अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस; ओबीसी आरक्षण, मलिकांच्या राजीनाम्यावरुन विरोधक आक्रमक होणार
- BharatPe on Ashneer Grover: भारतपेचा सह-संस्थापक अश्नीर ग्रोव्हरवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय, शेअर्सही परत घेणार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha