नवी दिल्ली: युक्रेनमधील खारकिव्हमध्ये अडकलेल्या भारतीय भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी रशियाने सहा तास युद्ध थांबवल्याची बातमी देशातील प्रमुख वाहिन्या आणि वृत्तपत्रांनी राष्ट्रीय सुरक्षा विश्लेषक असलेले नितीन गोखले यांच्या दाव्याने प्रसारित केली होती. आता यावर परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे. यासंबंधी प्रसारित झालेल्या बातम्या चुकीच्या असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. 


परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, या संबंधी ज्या काही बातम्या प्रसारित झाल्या त्या चुकीच्या आहेत. केवळ रशियाच नव्हे तर युक्रेननेही भारतीय नागरिक सुरक्षितपणे बाहेर पडावेत, आजूबाजूच्या सीमांवर पोहोचावेत यासाठी प्रयत्न केले आहेत.


 






पंतप्रधान मोदींची पुतिन यांच्याशी चर्चा
बुधवारी रात्री पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी मोदींनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली होती. खारकिव्हमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा युक्रेनच्या सैन्याकडून सुरक्षा ढालीसारखा वापर केला जात आहे असं पुतिन म्हणाले. पुतिन यांनी या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत करण्याचं आश्वासन दिलं.


भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी रशियाने सहा तास युद्धबंदीची घोषणा केली आहे. या दरम्यान, भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रशिया सैन्याकडून एक कॉरिडॉर करण्यात येणार असल्याचंही पुतिन यांनी सांगितलं. 


युक्रेनच्या खारकिव्हमध्ये अजूनही हजारो विद्यार्थी अडकल्याची माहिती समोर येत आहे. काही भारतीयांनी सांगितलं की, युक्रेनच्या सैन्याकडून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर पडू दिलं जात नाही.


दरम्यान, भारतीय विद्यार्थ्यांनी बाहेर जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला तर गोळ्या घातल्या जातील, अशी धमकी देत भारतीय महिलांना युक्रेनमध्ये मारहाण करण्यात आल्याचा दावा एका विद्यार्थीनीने केला आहे. 


संबंधित बातम्या: