BharatPe on Ashneer Grover : BharatPe ने  त्यांचे सह-संस्थापक अश्नीर ग्रोवर ( Ashneer Grover) यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांच्याकडून कंपनीचे शेअर्सही परत घेतले जाणार असल्याचे सांगितले. भारत पेच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर, अश्नीर ग्रोव्हरला त्याची गैरवर्तणुक आणि गैरव्यवहारामुळे कंपनीच्या सर्व पदांवरून काढून टाकण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. 


अश्नीर ग्रोव्हरने कंपनीच्या खात्यातून पैसे काढले
भारत पे ने दिलेल्या माहितीनुसार, ग्रोव्हर कुटुंब आणि त्यांच्या नातेवाईकांनी कंपनीच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता केली आहे. ते येथेच थांबले नाहीत, बनावट विक्रेते तयार करून कंपनीच्या खात्यातून पैसे उकळले गेले आणि कंपनीच्या पैशांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाला. BharatPe ने  म्हटले, मंगळवारी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक झाली, ती रात्री उशिरापर्यंत चालली. या बैठकीत ग्रोव्हरच्या केलेल्या गैरव्यवहार बाबत चर्चा झाली. बैठकीनंतर कंपनीने दिलेल्या निवेदनात ग्रोव्हर यांना सर्व पदांवरून हटवल्याची माहिती देण्यात आली आहे. लेखापरीक्षण अहवालात समोर आलेल्या तथ्यांच्या आधारे कारवाई करण्याचा अधिकार असल्याचे भारतपे कडून सांगण्यात आले.



भारतपेमध्ये ग्रोव्हरचा 9.5 टक्के हिस्सा
ग्रोव्हर यांनी मंगळवारी राजीनामा दिला. सूत्रांनी सांगितले की, भारतपेच्या संचालक मंडळाने ग्रोव्हरच्या व्यवस्थापकीय संचालक आणि कंपनीच्या संचालक मंडळाच्या संचालकपदाचा राजीनामा दिल्याची दखल घेतली आहे. तथापि, ग्रोव्हरने बोर्डाच्या मान्यतेशिवाय राजीनामा दिला आणि कंपनीला त्याच्या 1.4 टक्क्यांपर्यंतचा हिस्सा काढण्याचा अधिकार दिला. ग्रोव्हरकडे सध्या BharatPe मध्ये ९.५ टक्के हिस्सा आहे. ग्रोव्हर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कंपनीच्या वैयक्तिक स्वरूपाच्या विधानामुळे मला आश्चर्य वाटले नाही. असे ते म्हणाले. 


अश्नीरने कंपनीला म्हटले - Goodluck
अश्नीर म्हणाले, या विधानामागे वैयक्तिक द्वेष आणि वाईट विचार आहे. मला जाणून घ्यायचे आहे की अमरचंद, PwC आणि A&M पैकी कोणी जीवनशैली ऑडिट करण्यास सुरुवात केली आहे. ग्रोव्हर म्हणाले, मला आशा आहे की संचालक मंडळ लवकरच काम सुरू करेल. एक स्टेकहोल्डर या नात्याने, मला मुल्यांकन घसरल्याबद्दल काळजी वाटते. मी कंपनी आणि संचालक मंडळाला लवकर पुनर्प्राप्तीसाठी शुभेच्छा देतो.


अश्नीर ग्रोव्हरला सर्व पदांवरून हटवण्यात आले आहे
भारतपे कंपनीच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता करण्यात ग्रोव्हरचे कुटुंब आणि नातेवाईकांचाही सहभाग असल्याचे आढळून आले आहे. ग्रोव्हर कुटुंबाच्या निंदनीय वर्तनामुळे भारतपे, त्यांचे कर्मचारी आणि जागतिक दर्जाचे तंत्रज्ञानाची प्रतिष्ठा, संचालक मंडळ कलंकित होऊ देणार नाही, असे कंपनीने बुधवारी एका निवेदनात म्हटले आहे. ग्रोव्हर त्याच्या चुकीच्या कृत्यांमुळे ते यापुढे कंपनीचे संस्थापक किंवा संचालक किंवा कर्मचारीही नसणार आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha