Russia Ukraine War : भारतीय मुलांनी ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला तर गोळ्या घातल्या जातील, अशी धमकी देत भारतीय महिलांना युक्रेनमध्ये मारहाण करण्यात आली आहे. याबरोबरच भारतीय विद्यार्थ्यांना ट्रेनमध्ये चढण्यापासून रोखले जात आहे, अशी माहिती खारकिव्हमधून बाहेर पडलेल्या विद्यार्थीनीने दिली आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर असलेल्या खारकिव्हवर रशियाने हल्ला केला आहे. त्यामुळे तेथील लोक शहर सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, भारतीय विद्यार्थ्यांना ट्रेनमध्ये चढू दिले जात नाही. शिवाय ट्रेनमध्ये चढला तर गोळ्या घालण्यात येतील अशी धमकी दिली जात आहे. अशी माहिती खारकिव्ह येथून युक्रेन-रशिया सीमेवर पोहोचल्यानंतर सेजल नावाच्या विद्यार्थीनीने एबीपी न्यूजसोबत बोलताना दिली आहे.
सेजल हिने सांगितले की, "युक्रेनचे नागरिक भारतीय नागरिकांसोबत गैरवर्तन करत आहेत. खारकिव्ह शहर सोडण्यास सांगण्यात आल्यानंतर आम्ही ट्रेनमधून रशियाच्या सीमेवर जाण्यासाठी प्रयत्न केला. परंतु, आम्हाला मारहाण करून ट्रेनमधून बाहेर काढण्यात आले. आम्ही 30 किलोमीटर चालल्यानंतर कसे तरी युक्रेन-रशिया सीमेवर सुरक्षित ठिकाणी पोहोचलो.परंतु, खारकिव्हमध्ये युक्रेनियन लोकांनी भारतीयांना खूप त्रास दिला. अजूनही 1500 विद्यार्थी खारकिव्हमध्ये अडकले, असल्याचे सेजलने सांगितले.
दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष सुरू आहे. दोन्ही देशांमधील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. युक्रेनकडून आतापर्यंत रशियाचे सहा हजार पेक्षा जास्त सैनिक मारले गेल्याचे युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. तर रशियाने युक्रेनला चारही बाजूंनी घेरले असल्याचे म्हटले आहे.
युक्रेनमधील खारकिव्हमध्ये अजूनही अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. युक्रेनमधील भारतीयांना परत आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत दोन हजार पेक्षा जास्त भारतीयांना मायदेशी परत आणण्यात आले आहे.
Ukraine Students : भारतीय विद्यार्थ्यांना ट्रेनमध्ये प्रवेश मिळेना, खारकिव्ह सोडायचं तरी कसं?
महत्वाच्या बातम्या
- Ukraine Russia War : युक्रेनमध्ये उतरू शकत नाही विमान, नवीन शेखरप्पाचं पार्थिव खारकिव्हमधून भारतात कसं आणणार?
- Russia Ukraine War: जेवणासाठी घराबाहेर पडला अन् घात झाला.... रशियन बॉम्बहल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
- Russia Ukraine War: युक्रेनमध्ये दुसऱ्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, पंजाबमधील विद्यार्थ्याला पक्षाघाताचा झटका
- Russia Ukraine War : मिसाईल हल्ल्यानंतर युक्रेनमधील खारकिव्ह बेचिराख, मन हेलवणारी दृश्य