एक्स्प्लोर

खरी 'श्रीमंती' ! मित्तल यांच्याकडून 7 हजार कोटी रुपये समाजसेवेसाठी दान

उद्योगपती सुनील मित्तल हे केवळ 7 हजार कोटींची संपत्ती समाजसेवेसाठी दान करुनच थांबले नाही, तर त्यांनी 'एअरटेल' कंपनीतील आपले 3 टक्के शेअर्सही सामाजिक कामांच्या खर्चासाठी देऊन टाकले.

नवी दिल्ली : टेलिकॉम क्षेत्रातील जायंट मानल्या जाणाऱ्या 'एअरटेल' कंपनीचे चेअरमन सुनील मित्तल यांनी आपल्या खऱ्याखुऱ्या 'श्रीमंती'चं दर्शन घडवलं आहे. आपल्या एकूण संपत्तीतील 10 टक्के भाग म्हणजे तब्बल 7 हजार कोटी रुपये सामाजिक कामांसाठी दान करण्याची घोषणा केली आहे. भारती फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कामं केली जातात. उद्योगपती सुनील मित्तल हे केवळ 7 हजार कोटींची संपत्ती समाजसेवेसाठी दान करुनच थांबले नाही, तर त्यांनी 'एअरटेल' कंपनीतील आपले 3 टक्के शेअर्सही सामाजिक कामांच्या खर्चासाठी देऊन टाकले. त्याचसोबत, दुर्बल आणि वंचित समाज घटकांमधील तरुण-तरुणींना मोफत शिक्षण घेता यावं म्हणून 'सत्य भारती विश्वविद्यापीठ' स्थापन करण्याची घोषणाही सुनील मित्तल यांनी केली आहे. हे विश्वविद्यापीठ विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रमांसाठी वाहिलेले असेल. उत्तर भारतात सत्य भारती विश्वविद्यापीठ स्थापन केले जाईल. 2021 साली विश्वविद्यापीठ सुरु करण्याचा मानस मित्तल यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. सत्य भारती विश्वविद्यापीठत विज्ञान आणि तंत्रज्ञानावर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि समाजातील वंचित विद्यार्थ्यांना इथे मोफत शिक्षण देण्याची सुविधा करण्यात येणार आहे. सुनिल मित्तल कोण आहेत? एअरटेल' कंपनीचे चेअरमन असलेल्या सुनील मित्तल यांचा जन्म पंजाबमध्ये झाला. त्यांचे वडील सत पॉल मित्तल हे लुधियानातून काँग्रेसकडून राज्यसभेचे खासदार होते. टेलिकॉम, विमा, रिअल इस्टेट, मॉल्स, हॉस्पिटॅलिटी, कृषी इत्यादी क्षेत्रात मित्तल यांचा व्यवसाय आहे. 'भारती एअरटेल' ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. 2007 साली सुनील मित्तल यांना भारतातील तिसरा सर्वोच्च पुरस्कार अर्थात 'पद्मभूषण'ने गौरवण्यात आले. 15 जून 2015 रोजी सुनील मित्तल यांनी इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सच्या चेअरमनपदी निवड झाली.

महत्त्वाच्या बातम्या

BJP-SAD Alliance For Punjab Elections : मोठी बातमी : जो बडा भाई होता है, वही चीफ मिनिस्टर होता है, अमित शाहांचा अकाली दलाला शब्द, पंजाबमध्ये भाजप धाकट्या भावाच्या भूमिकेत!
मोठी बातमी : जो बडा भाई होता है, वही चीफ मिनिस्टर होता है, अमित शाहांचा अकाली दलाला शब्द, पंजाबमध्ये भाजप धाकट्या भावाच्या भूमिकेत!
Ramdas Athawale on Sharad Pawar : 2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
BJP-SAD Alliance Punjab : मोठी बातमी : पंजाबमध्ये विभागलेले जुने मित्र पुन्हा एकत्र, भाजप-अकाली दलाची युती, अमित शाहा म्हणाले, जुन्या मित्राचं स्वागत!
मोठी बातमी : पंजाबमध्ये विभागलेले जुने मित्र पुन्हा एकत्र, भाजप-अकाली दलाची युती, अमित शाहा म्हणाले, जुन्या मित्राचं स्वागत!
Paper Leak Case: पेपरफुटी करणाऱ्यांवर आता 10 कोटींचा दंड; 10 वर्षांपर्यंत कारावास, उच्चस्तरीय समितीच्या दुसऱ्या अहवालात महत्त्वाच्या शिफारशी, परीक्षार्थींना मोठ्या दिलासा मिळण्याची शक्यता
पेपरफुटी करणाऱ्यांवर आता 10 कोटींचा दंड; 10 वर्षांपर्यंत कारावास, उच्चस्तरीय समितीच्या दुसऱ्या अहवालात महत्त्वाच्या शिफारशी, परीक्षार्थींना मोठ्या दिलासा मिळण्याची शक्यता

व्हिडीओ

Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramayana : मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
भिवंडीत शोरमा खाल्ल्याने विषबाधा, 34 जणांवर उपचार सुरु, लहान मुलांचाही समावेश, ए.के. शोरमा दुकानावर महापालिकेची तोडक कारवाई!
भिवंडीत शोरमा खाल्ल्याने विषबाधा, 34 जणांवर उपचार सुरु, महापालिकेकडून तोडक कारवाई सुरु
Vaibhav Sooryavanshi :  एक-दोन बॉल खेळल्यानंतरच मला..., 204 धावांची वादळी खेळी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीची पहिली प्रतिक्रिया, बेबी बॉस काय म्हणाला?
एक-दोन बॉल खेळताच विकेटचा अंदाज, 204 धावा करणारा वैभव सूर्यवंशी म्हणाला...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
Gold Rate : सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, सोने दरासाठी 3 तारखा महत्त्वाच्या, सोनं महागणार की स्वस्त होणार?
सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, येत्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?
Beed Leopard vs dog: आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
UP Vidhansabha Election: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
Embed widget