एक्स्प्लोर

भय्यू महाराजांची सुसाईड नोट सापडली!

भय्यूजी महाराज यांना ‘राष्ट्रसंत’ म्हणून संबोधलं जातं. अध्यात्मिक क्षेत्रात ते प्रसिद्ध आहेत. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ते सक्रीय होते.

इंदौर : आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी इंग्रजी भाषेत एक पानी सुसाईड नोट लिहिली होती. सुसाईड नोट सापडली असून, आपल्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार न धरण्याचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. कुटुंबाची काळजी कुणीतरी घ्या. ताण असह्य झाला आहे. खूप थकलोय. मी सोडून जात आहे, असे भय्यू महाराज यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. भय्यू महाराजांची सुसाईड नोट सापडली! गोळी झाडून जीवन संपवलं! भय्यू महाराजांनी स्वत:वर गोळ्या झाडल्या, त्यावेळी घरात त्यांची आई आणि पत्नीही होती. गोळ्यांचा आवाज ऐकून तेथे उपस्थित सहकाऱ्यांच्या मदतीने भय्यू महाराजांच्या रुमचा दरावाजा तोडण्यात आला आणि त्यांना बाहेर काढून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत.. सर्वांशी सख्य, भय्यू महाराज कोण होते?

भय्यू महाराज यांचं मूळ नाव उदयसिंह देशमुख आहे. मध्य प्रदेशातील शुजालपूरमध्ये 1968 साली त्यांचा जन्म झाला.भय्यू महाराजांचं कुटुंब मूळचं अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालूक्यातील तामसी गावाचं. मात्र पाच दशकांपूर्वी त्यांचे वडील मध्यप्रदेशातील शुजालपूर गावात स्थायिक झाले. त्यानंतर त्यांचा या गावाशी अगदी तुरळक असा संबंध आला.

लहानपणापासूनच त्यांचा आध्यात्माकडे कल होता. घोडेस्वारी आणि तलवारबाजीचा शौक त्यांना होता.

भय्यू महाराजांनी काही काळ मुंबईत खासगी कंपनीत नोकरी केली. पण नोकरीत मन न रमल्याने त्यांनी राजीनामा दिला. ‘सियाराम’ या कपड्यांच्या कंपनीसाठी मॉडेलिंगही त्यांनी केली. मात्र आध्यात्माच्या ओढीने मॉडेलिंगला सोडचिठ्ठी दिली. सदगुरु दत्त धार्मिक आणि परमार्थिक ट्रस्टची सुरुवात केली.

दिग्गजांसोबत उठबस

भय्यूजी महाराज यांना ‘राष्ट्रसंत’ म्हणून संबोधलं जातं. अध्यात्मिक क्षेत्रात ते प्रसिद्ध आहेत. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ते सक्रीय होते. राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांसोबत त्यांची उठबस असे. इंदूरमध्ये त्यांचं मुख्यालय आणि आश्रम आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात भय्यू महाराजांचे अनुयायी आहेत.

आतापर्यंत अनेक दिग्गजांच्या आश्रमाला भेटी

कलाकार, गायक, उद्योगपती, राजकारण इत्यादी अनेक दिग्गज व्यक्ती भय्यू महाराजांच्या आश्रमात येत. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख, शरद पवार, लता मंगेशकर, उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, मिलिंद गुणाजी इत्यादी अनेक दिग्गज भय्यू महाराजांच्या आश्रमात जाऊन आले आहेत.

अण्णांच्या आंदोलनात मध्यस्थाची भूमिका

भय्यू महाराज यांनी 2011 साली लोकपाल आंदोलनातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. अण्णा हजारेंचं आंदोलन मागे घेण्यासाठी केंद्र सरकारने भय्यू महाराजांनी दूत म्हणून पाठवले होते. तसेच, गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा सद्भावना उपवास सोडण्यासाठी भय्यू महाराज यांना बोलावले गेले होते.

भय्यू महाराज यांचं कार्य

भय्यू महाराज हे सदगुरु धार्मिक ट्रस्ट नावाने ट्रस्ट चालवत असत. या ट्रस्टच्या माध्यमातून स्कॉलरशिप देत. तसेच, कैद्यांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत करत. शेतकऱ्यांना बियांणांचे वाटप असो किंवा शेतकऱ्यांना विविध मदत करण्यासाठीही त्यांनी मदत केली. भूमी सुधारणा, पेयजल आणि बालशिक्षण क्षेत्रात त्यांनी काम केले आहे.

नगरच्या निर्भयाचं स्मारक

अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या सर्वोदय परिवाराच्या वतीनं अहमदनगरमधील कोपर्डी इथं बलात्कार पीडित चिमुकलीचं स्मारक बांधण्यात आलं होतं.

भय्यू महाराजांवर हल्ला

महाराष्ट्रात मराठा मोर्चे निघत होते त्या काळात भय्यूजी महाराज यांच्यावर हल्लेही झाले होते.

भय्यू महाराज यांच्यावर दोन वेळा प्राणघातक हल्ला झाल्याची तक्रार त्यांच्या चालकानं 10 मे 2016 रोजी दाखल केली होती. या हल्ल्यामध्ये भय्यूजी महाराज सुखरुप होते, तर कारचालक आणि सहकाऱ्यांना इजा झाली होती.

काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेश सरकारने भय्यू महाराजांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देऊ केला होता. मात्र त्यांनी तो दर्जा नाकारला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court :इंटरनेट पूर्ववत करा,मेट्रो- रेल्वे संदर्भात 9 ऑक्टोबरच्या आदेशाचं पालन झालं का? सुप्रीम कोर्टाकडून दिल्ली पोलिसांना अवमान याचिका प्रकरणी नोटीस जारी
इंटरनेट पूर्ववत करा, 9 ऑक्टोबरच्या आदेशाचं पालन झालं का? सुप्रीम कोर्टाकडून दिल्ली पोलिसांना अवमान याचिका प्रकरणी नोटीस जारी
Sanjay Raut on PM Modi: भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
Dhruv Rathee :अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांची सुटका, यूट्यूबर ध्रुव राठीचं काय झालं?
Dhruv Rathee :अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांची सुटका, ध्रुव राठीचं काय झालं?
Abhijeet Dipke : दिल्लीतील आंदोलन पुन्हा पेटणार; अभिजीत दिपकेंसह सौरभ दास आणि रांका यांची कोर्टाकडून जामिनावर सुटका
दिल्लीतील आंदोलन पुन्हा पेटणार; अभिजीत दिपकेंसह सौरभ दास आणि रांका यांची कोर्टाकडून जामिनावर सुटका

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar : 'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Sanjay Raut on PM Modi: भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
Embed widget