एक्स्प्लोर

दोन ट्रेन समोरासमोर आल्या तरी होणार नाही टक्कर, स्वदेशी बनावटीच्या स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली 'कवच'ची यशस्वी चाचणी

indian railways : दोन ट्रेन समोरासमोर आल्या तरी आता त्यांच्यामध्ये टक्कर होणार नाही. स्वदेशी बनावटीच्या स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली 'कवच'ची चाचणी घेण्यात आली आहे. ही चाचणी यशस्वी झाली आहे.

BharatKaKavach : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. यापुढे रेल्वेचा प्रवास आणखी सुरक्षित होणार आहे. नुकतीच स्वदेशी बनावटीच्या स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली 'कवच'ची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. सिकंदराबादमध्ये एकाच रुळावर दोन गाड्या समोरासमोर पूर्ण वेगाने आणून स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली प्रतिकूल परिस्थितीत गाड्यांची टक्कर थांबवू शकते का? याची यशस्वी चाचणी करण्यात आली.  रेल्वे मंत्रालयाने या चाचणीचा व्हिडीओ त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे. 

स्वदेशी बनावटीच्या स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणालीच्या चाचणीदरम्यान एक ट्रेन दुसर्‍या ट्रेनपासून सुमारे 380 मीटर अंतरावर थांबवली. हे तंत्रज्ञान भारतात विकसित करण्यात आले असून त्याचा फायदा जगालाही होणार आहे. विशेष बाब म्हणजे या चाचणीवेळी एका ट्रेनमध्ये रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनय कुमार त्रिपाठी बसले होते. तर दुसऱ्या ट्रेनमध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव बसले होते.  

रेल्वेमंत्र्यांनी काल दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या सिकंदराबाद विभागातील लिंगमपल्ली-विकराबाद विभागादरम्यान स्वदेशी ट्रेन संरक्षण प्रणाली 'कवच' ची चाचणी घेतली. रेल्वे मंत्र्यांसोबत रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ विनय कुमार त्रिपाठी आणि इतर वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित होते. आर्थिक वर्ष 2022-23 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सुमारे दोन हजार किमी रेल्वे ट्रॅक संरक्षण प्रणालीखाली आणण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ही चाचणी घेण्यात आली. 

स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली 'कवच' असे करेल काम
स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली 'कवच' हे रिसर्च डिझाईन आणि स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (RDSO) ने भारतीय उद्योगाच्या सहकार्याने विकसित केले आहे. हे तंत्र इतकं अचूक आहे की, भरधाव वेगाने धावणाऱ्या दोन गाड्या समोरासमोर आल्या तरी त्यांची टक्कर होणार नाही. रेड सिग्नल ओलांडताच ट्रेनला आपोआप ब्रेक लागेल. यावेळी मागूनही एखादी ट्रेन येत असेल तर ती ट्रेनही आपोआप थांबेल. ट्रेन मर्यादेपेक्षा जास्त वेगाने धावत असेल तरीही दुसरी ट्रेन समोर आल्यानंतर आपोआप ब्रेक लावला जाईल, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेने दिली आहे. 

महत्वाच्या बातम्या

Paytm : आता रेल्वे तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट बुक करण्यासाठी देखील होणार पेटीएमचा उपयोग, असे करा बुकिंग

Job Majha : मध्य रेल्वे, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि IBM नागपूर येथे नोकरीची संधी, पाहा डिटेल्स

महत्त्वाच्या बातम्या

US China Trade War : ट्रम्प-शी जिनपिंग भेटीनंतर मोठा गेम प्लॅन! अमेरिका-चीनकडून 60 अब्ज डॉलरचा करार; भारताची चिंता का वाढली?
ट्रम्प-शी जिनपिंग भेटीनंतर मोठा गेम प्लॅन! अमेरिका-चीनकडून 60 अब्ज डॉलरचा करार; भारताची चिंता का वाढली?
मोठी बातमी! महाराष्ट्राचा 'दुष्काळ' दिल्लीत चर्चेत; केंद्रीय कृषीमंत्री पथकासह पाहणीस येणार, तारीख ठरली
मोठी बातमी! महाराष्ट्राचा 'दुष्काळ' दिल्लीत चर्चेत; केंद्रीय कृषीमंत्री पथकासह पाहणीस येणार, तारीख ठरली
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
Death Certificate New Rules : मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी

व्हिडीओ

Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Bank protest : बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून सुरु होणारा तीन दिवसांचा संप मागे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tata : टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, दोन कंपन्यांच्या विलिनीकरणाचं नियोजन सुरु
टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, विलिनीकरणाचा डाव टाकणार
MLAs Respect Mandatory Rules : आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
Satara: सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी साताऱ्यात घडामोडींना वेग, नेत्यांच्या भेटीगाठी सुरुच, शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतली उदयनराजेंची भेट 
सातारा जिल्हा बँकेसाठी नेत्यांच्या भेटीगाठी सुरु,शिवेंद्रराजेंनी घेतली उदयनराजेंची भेट, निवडणूक महायुती म्हणून लढण्यावर एकमत
MPSC कडून 3 ऑक्टोबरची राज्य सेवा मुख्य परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय , आदित्य ठाकरे राज्यपालांचे आभार मानत म्हणाले... 
MPSC कडून 3 ऑक्टोबरची राज्य सेवा मुख्य परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय , आदित्य ठाकरे राज्यपालांचे आभार मानत म्हणाले... 
सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त
सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
Election : माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी प्रचाराचा नारळ फोडला, पुणे शिक्षक मतदारसंघातून रिंगणात उतरणार, विधानपरिषदेची रणधुमाळी सुरु  
माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी प्रचाराचा नारळ फोडला,पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीची आशा
आदित्य ठाकरेंची महापौर रितू तावडेंवर टीका, भाजपचा पलटवार; मुंबईतील 14 फुटांच्या झोपडपट्ट्यांवरुन जुंपली
आदित्य ठाकरेंची महापौर रितू तावडेंवर टीका, भाजपचा पलटवार; मुंबईतील 14 फुटांच्या झोपडपट्ट्यांवरुन जुंपली
Embed widget