Success Story: शेतकरी (Farmers) आपल्या शेतात विविध प्रयोग करताना दिसत आहेत. आधुनिक पद्धतीनं विविध पिकांची लागवड करुन भरघोस उत्पादन घेत आहेत. आज आपण अशात एका युवकाची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत. ज्या शेतकऱ्याने कारल्याच्या पिकातून (karela farming) आर्थिक प्रगती साधली आहे. उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील शरीफाबाद या गावच्या सचिन कश्यप या शेतकऱ्याने कारल्याचे पिकातून लाखो रुपयांचा नफा मिळवला आहे. जाणून घेऊयात सचिनची यशोगाथा.
लाखो लाखो रुपयांची कमाई
भाजीपाला पिकातून देखील शेतकरी चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवू शकतो याचे उदाहरण म्हणजे सचिन कश्यप यांची शेती. कारल्याच्या लागवडीतून सचिन यांनी मोठा नफा मिळवला आहे. ते घरी बसून लाखो लाखो रुपयांची कमाई करत आहेत. विशेष म्हणजे सचिन हे 9 वी पर्यंतचे शिक्षण झाले आहेत. आज सचिन कश्यप यांचे वय 19 वर्ष आहे. शेतकरी सचिन कश्यप यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 6 वर्षांपासून ते कारल्यांचे पीक घेत आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात कारल्याची लागवड केली जाते. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत पीक तयार होते.
संकरित कारल्याची लागवड
बाराबंकी जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी हायब्रीड कारल्याच्या व्यावसायिक लागवडीवर भर देत आहेत. ते संकरित कारल्यांचे उत्पादनही घेतात. हायब्रीड कारल्याची झाडे झपाट्याने वाढतात आणि त्यांची फळे बरीच मोठी असतात. त्यांची संख्याही जास्त आहे. परंतु स्थानिक कारल्याप्रमाणेच त्यांची लागवड केली जाते. सचिन यांना कारल्याचे उत्पादन घेण्यासाठी 30 हजार रुपयांचा खर्च आला होता. यातून त्यांना 4 लाख रुपयांचे उत्पादन मिळाले आहे. कारले हे आरोग्यासाठी लाभदायी असते. ते खाण्याचे विविध फायदे आहेत.
20 अंश ते 40 अंश सेल्सिअस तापमान योग्य
कारल्याची लागवड करण्यासाठी जास्त तापमानाची गरज नसते. पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी 20 अंश ते 40 अंश सेल्सिअस तापमान योग्य मानले जाते. याशिवाय, कारल्याच्या शेतात ओलावा राखणे देखील खूप महत्वाचे आहे. तसेच कारल्याच्या पिकासाठी पाण्याचे देखील योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. तसेच कारल्याच्या पिकासाठी निचरा होणाऱ्या जमिनीची गरज असते. योग्य जमिन आणि योग्य प्रमाणात पाणी दिल्यास कारल्याचे पिक चांगले येते. यामधून कमी काळात आणि कमी खर्चात शेतकरी लाखो रुपयांचा नफा शेतकरी मिळवू शकतात.
महत्वाच्या बातम्या:
2 कोटी रुपयांची नोकरी सोडून सुरु केलं स्टार्टअप, कशी मिळाली आयुष्याला कलाटणी? तरुण उद्योजकाची यशोगाथा