Tutort Academy: शिक्षण घेतल्यावर अनेकांचे मोठी नोकरी (Job) मिळवण्याचं स्वप्न असतं. पण काहीजण चांगली मिळालेली नोकरी सोडून पुन्हा व्यवसायाकडे वळत आहेत. आज आपण अशाच  एका तरुणाची यशोगाथा (success story) पाहणार आहोत, ज्याने संघर्षातून स्वत:चं एक वेगळं विश्व निर्माण केलं आहे. मनू अग्रवाल असं या तरुण उद्योजकाचं नाव आहे. मनू अग्रवालने 2 कोटी रुपयांची नोकरी सोडून Tutort Academy ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुरु केलाय. 


मायक्रोसॉफ्टमधील सुमारे 2 कोटी रुपयांची नोकरी सोडली  


मनू अग्रवालने गुगल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यामध्ये नोकरी केली आहे. सुरुवातीच्या काळात अग्रवालला अनेक कपन्यांनी नोकऱ्या देण्यास नकार दिला होता. मात्र, नंतरच्या काळात त्यांनी अनेक चांगल्या कंपन्यामध्ये काम केलं. मनू अग्रवालला मायक्रोसॉफ्टमध्ये सुमारे 2 कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले होते. पण, त्याने ही सोडून आपले स्टार्टअप Tutort सुरु करण्याचा निर्णय घेतला. मनू अग्रवाल यांचा मोठा संघर्ष आहे. मोठ्या संघर्षातून त्यांनी हे यश मिळवलं आहे. 


सुरुवातीला विप्रोमध्ये मिळाली 10 हजार रुपयांची कंपनी 


मनू अग्रवाल हे मुळचे उत्तर प्रदेशातील झाशी या छोट्याश्या गावचे रहिवाशी होते. त्यांनी सुरुवातीचं त्याचं शिक्षण सरकारी शाळेत पूर्ण केलं. त्यानंतर बुंदेलखंड विद्यापीठातून त्यांनी बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स चं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी नोकरी शोधायला सुरुवात केली मात्र, त्यांना काही नोकरी मिळाली नाही. अनेक कंपन्यांनी नकार दिला. काही कालावधी गेल्यानंतर त्यांना विप्रोमध्ये 10 हजार रुपयांची नोकरी मिळाली. नोकरी लागल्यानंतर मनू यांनी पुढची शिक्षण घेतलं. त्यांनी तिरुचिरापल्ली येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून मास्टर्स इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (एमसीए) पदवी घेतली. 


2016 मध्ये मनू अग्रवाल यांच्या आयुष्याला कलाटणी 


2016 मध्ये मनू अग्रवाल यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना घडली. त्यांना मायक्रोसॉफ्ट या बड्या कंपनीत त्यांना इंटर्नशिप मिळाली. इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर त्यांना मायक्रोसॉफ्टने सिएटल, वॉशिंग्टनमध्ये नोकरी दिली. सुरुवातीला मनूला 1.9 कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले. त्यानंतर मनूने 2021 मध्ये नोकरी सोडून  मित्र अभिषेक गुप्तासोबत Tutort Academy ऑनलाइन स्टार्टअप सुरु केले. 


महत्वाच्या बातम्या:


फुटपाथ ते माइक्रोसॉफ्ट! डिझाइनींगच्या क्षेत्रात अस्तित्व निर्माण करणाऱ्या संघर्षकन्येची यशोगाथा