एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तासाभराने सेल्फी पाहताना समजलं मित्र पाण्यात बुडाला!
विद्यार्थ्यांनी काढलेल्या एका सेल्फीमध्ये विश्वास पाण्यात बुडताना दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यावेळी ही बाब त्यांच्यापैकी कोणाच्याही ध्यानात आली नाही.
बंगळुरु : सेल्फीचा नाद एखाद्याच्या जीवावर बेतल्याची अनेक उदाहरणं आजकाल पाहायला मिळतात. मात्र तलावामध्ये सेल्फी काढण्यात काही तरुण दंग असताना शेजारीच त्यांचा मित्र बुडून मृत्युमुखी पडल्याची घटना समोर आली आहे. तासाभरानंतर सेल्फी पाहताना आपला सहविद्यार्थी बुडाल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
17 वर्षीय विश्वास जी. या बंगळुरुमधील नॅशनल कॉलेजच्या विद्यार्थ्याचा रविवारी हौदामध्ये बुडून मृत्यू झाला. कर्नाटकातील रामनगर जिल्ह्यात असलेल्या रावगोंडलु बेट्टा भागात एनसीसीचे 25 विद्यार्थी सहलीसाठी गेले होते.
विद्यार्थ्यांनी काढलेल्या एका सेल्फीमध्ये विश्वास पाण्यात बुडताना दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यावेळी ही बाब त्यांच्यापैकी कोणाच्याही ध्यानात आली नाही. स्थानिक ग्रामपंचायतीने तलावातील पाण्यात उतरु नका, असा बोर्ड लावला होता, मात्र त्याकडे कोणीही लक्ष न दिल्याचं पोलिसांनी सांगितलं.
https://twitter.com/ANI/status/912539501125263360
'स्विमिंग संपवून आम्ही गुंडांजनेय देवळात चाललो होतो. मात्र विश्वास आमच्यासोबत नसल्याचं कोणाच्याही लक्षात आलं नाही. सेल्फी आणि फोटो पुन्हा पाहत असताना एका विद्यार्थ्याला विश्वास पाण्यात बुडताना दिसला.' असं एकाने सांगितलं.
तात्काळ याची माहिती प्राध्यापक गिरीश यांना देण्यात आली. मात्र तोपर्यंत एक तास उलटून गेला होता. विश्वास त्यांना कुठेच दिसला नाही. दुपारी साडेतीनच्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.
विश्वासचे पालक आणि नातेवाईकांनी त्याच्या मृतदेहासह कॉलेजसमोर आंदोलन केलं. एनसीसी युनिटचे इनचार्ज असलेले प्रा. गिरीश आणि शरद यांचं दुर्लक्ष आपल्या मुलाच्या जीवावर बेतल्याचा आरोप त्यांनी केला. विश्वासचे वडील रिक्षाचालक आहेत, तर आई गृहिणी आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement