एक्स्प्लोर

भारतातील खास पर्यटन स्थळं फक्त एका क्लिकवर

भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत की जिथं तुम्ही तुमची सुट्टी अगदी आरामात घालवू शकतात.

मुंबई : दिवाळी, ख्रिसमस किंवा उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की, फिरायलं कुठं जायचं हा प्रश्न सर्वात आधी समोर येतो. भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत की जिथं तुम्ही तुमची सुट्टी अगदी आरामात घालवू शकतात. त्यामुळे सुट्टी कुठे-कुठे एन्जॉय करता येईल हे जाणून घ्यायचं असेल तर ही बातमी नक्की पाहा. आग्रा : प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळख असलेलं ताजमहल पाहण्याची ज्यांना इच्छा आहे, ते आग्य्राला जाऊ शकतात. ताजमहलाशिवाय आग्रा फोर्ट, मेहताब बाग, जामा मशिद, फत्तेपूर सिक्री, मोती मशिद, दिल्ली गेट यांसारखी प्रमुख पर्यटनस्थळं आहेत. अमृतसर : अमृतसर भारताचं एक आध्यात्मिक शहर आहे, जिथे तुम्ही सुवर्ण मंदिरात दर्शन घेऊ शकता. दूख भंजन बेरी, महाराजा रणजीत सिंह संग्रहालय, जलियानवाला बाग, गांधी गेट यासारखी महान सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठिकाणं अमृतसरमध्ये पाहता येऊ शकतात. अंदमान आणि निकोबार बेट : खोल समुद्रात जाण्याचा रोमांचक अनुभव घ्यायचा असेल तर अंदमान-निकोबार बेटांचा प्रवास नक्की करा. तुम्ही इथे स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग आणि पॅरासीलिंगचा आनंद लुटू शकता. बनारस : बनारस अर्थात वाराणसीला जाऊन तुम्हाला सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक यात्रेचा अनुभव घेऊ शकता. अस्सी घाट, मनमंदिर घाट, मणिकर्णिका घाट, दुर्गा मंदिर आणि काशी विश्वनाथाचं मंदिर बनारसचं प्रमुख आकर्षण आहे. वाराणसी हे भारताच्या सर्वात प्राचीन शहरांपैकी एक असल्याचं म्हटलं जातं. दिल्ली : भारताची राजधानी दिल्लीत गेलात तर इथे पाहण्यासाठी एवढं काही आहे, की तुम्ही बोअर होणार नाही. इथे फिरण्यासाठी इंडिया गेट, लाल किल्ला, जामा मशिद, कुतुब मिनार, हुमांयुचा मकबरा, लोटस टेंपल, अक्षरधाम, चांदनी चौक, निजामुद्दीन दर्गा, गुरुद्वारा बंगला साहिब, लक्ष्मीनारायण मंदिर या ठिकाणांना नक्की भेट द्या कसोल : जर तुमचं निसर्गावर प्रेम असेल, सोबतच कॅम्प आणि ट्रेकिंगची मजा लुटायची असल्यास हिमाचल प्रदेशातील कसोल त्या ठिकाणांपैकी एक आहे. लडाख : अनेक बाईक रायडर्स पर्यटनासाठी लडाखला पसंती देतात. जंस्कार खोरं, खर्डुंग-ला पास, हेमिस नॅशनल पार्क आणि स्पितुक गोम्पा हे इथली आकर्षणं आहेत. मुंबई : मायानगरी मुंबई, शहर जे कधीही झोपत नाही, असं म्हटलं जातं. गेटवे ऑफ इंडिया, एलिफंटा गुहा, हाजी अली दर्गा, एस्सेल वर्ल्ड, सिद्धीविनायक मंदिर, कमला नेहरु पार्क, राजाबाई क्लॉक टॉवर, वरळी किल्ली, मरिन ड्राईव्ह आणि अशाच काही ठिकाणांहून मुंबई शहराच्या सौंदर्य न्याहाळता येऊ शकतं. नैनीताल : उत्तराखंडच्या हिरवळ घाटात असलेलं नैनीताल हे निसर्गप्रेमीसाठी फिरण्यासाठी चांगलं ठिकाण आहे. नैनीताल लेक, गुर्नी हाऊस, नैना देवी मंदिर, हनुमान गढ़ी आणि जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला भेट देऊ शकता. ऋषिकेश : सध्याचे तरुण अॅडव्हेंचरच्या शोधात ऋषिकेशला जातात आणि गंगामध्ये राफ्टिंगचा आनंद घेतात. सप्टेंबर ते नोव्हेंबर आणि फेब्रुवारी ते जून हा ऋषिकेश जाण्यासाठीचा उत्तम काळ आहे. श्रीनगर : श्रीनगरमध्ये तुम्ही निसर्गाचा आनंद लुटू शकता. डल झील, शालीमार बाग, निशात बाग, जामा मशिद, शंकराचार्य हिल आणि हजरतबल मशिद इथे फिरायला जाऊ शकता. गोवा : भारतातील उत्तम पर्यटनस्थळांपैकी एक म्हणजे गोवा. नाईट लाईफ आणि बीच गोव्याचे हाय पॉईंट आहेत. कलंगुट, अंजुना, फोर्ट आगुआदा, दुधसागर धबधबा, बोडगेश्वरचं मंदिर, सेंट झेवियर्सचे चर्च आणि ग्रँड आयलॅण्ड ही गोव्यातील आकर्षणं आहेत. आसाम : भारतात आसाम असं ठिकाण आहे, जिथे तुम्हाला वाईल्ड लाईफचा अनुभव घेता येईल. आसममध्ये जंगलाच्या सफरीशिवाय बोटिंगचा अनुभवही घेता येईल. राजस्थान : जर तुम्ही राजस्थानला जात असाल, तर तुम्हाला सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध अनेक आकर्षणं पाहायला मिळतील. जोधपूर, उदयपूर, चित्तौडगड, रणथंबोर आणि जयपूर यांसारख्या शहरांमध्ये पर्यटनाचा आनंद लुटू शकता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा

व्हिडीओ

Chandrapur Mayor : चंद्रपुरात पक्षाअंतर्गत कुरघोडीला उधाण  Special Report
Solapur Praniti shinde Vs Jaykumar gore : निकालानंतरचे शोले टीका, टोमणे, टोले Special Report
Samadhan Sarvankar : सरवणकरांचं अ 'समाधान' भाजपवर शरसंधान Special Report
NCP on ZP Election : महापालिकेच्या पराभवानंतर पवारांनी कोणता धडा घेतला? Special Report
BJP on Samadhan Sarvankar : समाधान सरवणकर यांना जी मत मिळाली ती फक्त भाजपमुळे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
Embed widget