दक्षिण ब्राझीलमध्ये पुराने जास्तच रौद्ररुप धारण केले आहे. त्याची प्रचिती 4 मे रोजी आली. दक्षिण ब्राझीलमध्ये लोकांना घेऊन जाणारे एक प्रवासी जहाज पाण्याखाली बुडालेल्या पुळावर आदळले. परिणामी हे जहाज पाण्यात थेट उलटले आहे. हा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाला असून या दुर्घटनेत अनेक प्रवासी दगावल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद
सध्या दक्षिण ब्राझीलमध्ये सध्या पुराने हाहा:कार माजवला आहे. या पुरात आतापर्यंत अनेक नागरिक बेपत्ता झाले आहेत. तर अनेक लोक जखमी झाले आहेत. या पुरातून लोकांना वाचवण्यासाठी ब्राझील सरकारकडून कठोर परीश्रम घेतले जात आहेत. मात्र याच पुराची दाहकता दाखवणारा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ दक्षिण ब्राझीलमधील आहे.
पाहा घटनेचा थरारक व्हिडीओ :
अनेक लोकांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
या पुरामुळे दक्षिण ब्राझीलमध्ये मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार आतापर्यंत या पुरात 56 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक बेपत्ता आहेत. ब्राझीलच्या रिओ ग्रांडे डो सुल या भागात तर परिस्थीती जास्तच विदारक आहे. येथे मुसळधार पावसामुळे सगळीकडे चिखल झाला आहे. या भागातही अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या ब्राझीलच्या बचाव पथकाकडून वेगाने बचावकार्य केले जात आहे.
हेही वाचा :
शेअरची किंमत फक्त 1 रुपया, पण गुंतवणूकदारांची होतेय भरघोस कमाई, ही कंपनी देणार बंम्पर रिटर्न्स?
मुथूट फायनान्सची उपकंपनी बेलास्टारचा लवकरच येणार आयपीओ, भरघोस नफा मिळवण्याची नामी संधी!
फॉर्म-1 ते फॉर्म-4 आयटीआर भरण्यासाठी कोणासाठी कोणता फॉर्म? जाणून घ्या...