मुंबई: भारताचे हिंदुत्व टिकवून ठेवण्यासाठी नरेंद्र मोदी (PM Modi) हे महत्त्वाचे आहे. काही निर्णय घेण्यासाठी बहुमत नाही तर प्रचंड बहुमत लागते आणि ते महत्त्वाचे आहे. मी स्वत: दोनदा कमळाचे बटन दाबलं. मला प्रभू श्रीराम भेटले. मी तिसऱ्यांदा बटन दाबलं तर तर मला कैलाश भेटेल, असं म्हणत गुवाहाटी येथील कामाख्या देवीचे(kamakhya temple) पुजारी असलेल्या गौरीश महाराज यांनी सर्वधर्मीयांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. 


कैलास पर्वत हे सर्वधर्मीयांचे महत्त्वाचे ठिकाण असून कैलासापर्यंत जाण्याचा मार्ग जवळपास 80 टक्के पूर्ण झाला आहे. आता अवघा 20% मार्ग बाकी असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले होते. त्यामुळे आता सर्वधर्मीयांनी तिसऱ्यांदा कमळ बटन दाबून भाजपला पुन्हा तिसऱ्यांदा सत्तेत बसवावे, असे आवाहन गौरीश महाराज यांनी केले आहे.


भाजपला मत दिलं तर पाकिस्तानात जल्लोष होईल: उद्धव ठाकरे


उद्धव ठाकरे यांनी रविवारी नवी मुंबईतील सभेत भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी भाजपकडून करण्यात येणाऱ्या प्रचारावर बोट ठेवले. भाजपकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा? भारतात की पाकिस्तानात? उद्धव ठाकरे यांनी हाच धागा पकडत म्हटले की, भाजपला मत दिलं तर पाकिस्तानात जल्लोष होईल, मोदीजी तुम्ही हरले तर भारतात जल्लोष होईल. काश्मीरमध्ये आजही हल्ले होत आहेत, मग तुम्ही 10 वर्ष काय खुर्च्या उबावताय. आता मोदीजी काय करताय? महागाई वर बोलताना दिसतात का? रोजगारावर बोलतात का? तर आता ते धर्माधर्मात तेढ निर्माण करत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.


फक्त नरेंद्र मोदी यांच्यामुळेच अयोध्येतील राममंदिर पूर्ण झाले: राज ठाकरे


मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अलीकडेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी कणकवली येथे सभा घेतली होती. यावेळी राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची तारीफ केली होती. अयोध्येतील राम मंदिर हे फक्त पंतप्रधान मोदी आणि सर्वोच्च न्यायालयामुळे उभे राहू शकले. इतके वर्षे फक्त राममंदिर उभारणीच्या घोषणा आणि बाता सुरु होत्या. मात्र, मोदींमुळे राम मंदिराचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले. त्या मंदिरात रामलल्ला विराजमान झाला, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. 


आणखी वाचा


जय श्रीराम! अयोध्या ते काशी 5 प्रमुख तीर्थक्षेत्रांना भेट द्या, भारतीय रेल्वेकडून पुण्य मिळवण्याची संधी! स्वस्तात टूर पॅकेज पाहा