मुंबई : मुथूट फायनान्सची (Muthoot Finance) या फायनान्स कंपनीची उपकंपनी बेलस्टार मायक्रोफायनान्स लिमिटेड ही कंपनी आपला आयोपीओ आणणार आहे. त्यासाठीची तयार म्हणून या कंपनीने सेबी (SEBI) या भाडंवली बाजार नियामक संस्थेकडे कागदपत्रे सोपवली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीचा आयोपीओ हा 1300 कोटी रुपयांचा असणार आहे. यातील साधारम 1000  कोटी रुपये हे फ्रेश इक्विटी शेअर तर साधारण 300 कोटी रुपये ऑफर फॉ सेलच्या माध्यमातून उभे केले जाणार आहेत. 

Continues below advertisement


उपकंपनी बेलस्टार माइक्रोफायनान्स कंपनी काय करते


सध्यातरी उपकंपनी बेलस्टार माइक्रोफायनान्स लिमिटेड  या कंपनीच्या साधारण 66 टक्के हिश्श्यावर मुथूट फायनान्स या कंपनीची मालकी आहे. ही कंपनी मुथूट फायनान्सप्रमाणेच अनेक मायक्रोफायनान्स प्रोडक्ट विकते. ही कंपनी लघु आणि शूक्ष्म कंपन्यांना, कंझ्यूमर गुड्स, फेस्टिव्हल, शिक्षण, आप्तकालीन परिस्थितीत लोन देण्याचे काम करते. प्रामुख्याने सेल्फ हेल्प ग्रुपला सपोर्ट करण्याचे काम ही कंपनी करते. 


सध्या फायद्यात आहे बेलास्टार मायक्रोफायनान्स 


या आयपीओच्या माध्यमातून येणाऱ्या पैशांतून ही कंपनी साधारण 760 कोटी रुपये भविष्यातील वर्किंग कैपिटलसाठी वापरणार आहे. उरलेली रक्कम इतर कॉर्पोरेट कामांसाठी वापरली जाणार आहे. डिसेंबरच्या तिमाहीत या कंपनीला 235 कोटी रुपयांचा नफा झाला होता. या कंपनीचे उत्पन्न 1283 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले होते. 


हेही वाचा :


फक्त 210 रुपयांत म्हातारपणी मिळणार 5000 रुपये पेन्शन! सरकारची 'ही' योजना तुम्हाला माहिती आहे का?


क्रेडिट कार्ड वापरताय? 'या' पाच गोष्टी टाळा, अन्यथा अडकू शकता कर्जाच्या विळख्यात!


फॉर्म-1 ते फॉर्म-4 आयटीआर भरण्यासाठी कोणासाठी कोणता फॉर्म? जाणून घ्या...