एक्स्प्लोर
नितीन गडकरींच्या कामांचे सोनिया गांधी आणि खर्गेंकडून कौतुक
सध्या देशभर जिकडे तिकडे रस्ते आणि उड्डाणपूलांचे काम सुरु असल्याचे आपल्याला पहायला मिळेल. यामधली बहुतांश कामे केंद्रीय दळवळण मंत्रालयाच्या आखत्यारित सुरु आहेत. या कामाचे दस्तुरखुद्द सोनिया गांधी यांनी कौतुक केले.
नवी दिल्ली : सध्या देशभर जिकडे तिकडे रस्ते आणि उड्डाणपूलांचे काम सुरु असल्याचे आपल्याला पहायला मिळेल. यामधली बहुतांश कामे केंद्रीय दळवळण मंत्रालयाच्या आखत्यारित सुरु आहेत. नितीन गडकरी या मंत्रालयाचे मंत्री आहेत. आज लोकसभेत गडकरींच्या या कामाचे विरोधकांकडूनही कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले.
काँग्रेसच्या ज्य़ेष्ठ नेत्या आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकसभेत आज बाक वाजवून नितीन गडकरींच्या कामाची प्रशंसा केली आहे. लोकसभेत नितीन गडकरींच्या खात्यासंदर्भात विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर नितीन गडकरी स्पष्टीकरण देत असताना विरोधकांनीदेखील गडकरींचे प्रशंसा केली.
लोकसभेत गडकरी भारतमाला परियोजना, दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे आणि चारधाम परियोजनेंसदर्भात माहिती देत होते. माहिती दिल्यानंतर गडकरी म्हणाले की, "मी खूप भाग्यवान आहे कारण, मला माझ्या पक्षासह सर्वच विरोधी पक्षाचे खासदारदेखील सांगतात की, त्यांच्या मतदार संघात खूप वेगाने विकासकामं सुरु आहेत. विरोधकही माझ्या कामाने समाधानी आहेत हे ऐकूण मला आनंद होतो." नितीन गडकरींचे बोलणे आटोपल्यावर भाजप, शिवसेनेसह भाजपच्या मित्रपक्षांच्या खासदारांनी बाक वाजवून कौतुक सुरु केले. यावेळी सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह विरोध पक्षातील अनेक खासदारांनी बाक वाजवून नितीन गडकरींच्या कामांची प्रशंसा केली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement