लडाख : भारत-चीन सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. चिनी सैनिक भारताता घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. याचा परिणाम आता देशांतर्गत दिसायला लागला आहे. ‘थ्री इडियट’ या सिनेमात आमिर खानने साकारलेल्या रँचोच्या भूमिकेमुळे जगभरात लोकप्रिय झालेले प्रसिद्ध अभियंते सोनम वांगचुक यांनीही चीनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भात त्यांनी युट्युब वरुन एक व्हिडीओ प्रसारित केला आहे.

या व्हिडीओमधून त्यांनी भारतीय सीमेवर सुरू असलेली घुसखोरी आणि तणावाची माहिती दिली आहे. याच वेळी त्यांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केलं आहे. यासाठी त्यांनी एक टॅगलाईनही तयार केली आहे. "सेना देगी बुलेटसे, नागरिक देंगे वॉलेटसे" भारतीय सीमेवर आपले सैन्य चीनला उत्तर देत आहे. मात्र, आता आपण चीनला आपल्या वॉलेटमधून उत्तर द्यायला हवे, असं आवाहन यातून वांगचुक यांनी केलं आहे.

मोदींशी न बोलताच ट्रम्प यांना चीनबद्दल भारताचा मूड कळाला? मध्यस्थीसाठी अमेरिकेचा उतावळेपणा

चीनच्या वस्तू आणि तंत्राज्ञावर बहिष्कार टाका
मेड इन चायना वस्तू आणि सॉफ्टवेयर आठवड्यात सोडून द्या. त्याऐवजी मेड अन इंडिया वस्तू आणि सॉफ्टवेयर वापरण्यासं वांगचूक यांनी सांगितले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत योजनेचं कौतुक केलं. ते स्वतः एक आठवड्याच्या आत सर्व चिनी वस्तू आणि तंत्राज्ञान वापरणे सोडणार असल्याचं म्हणाले. त्यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला हा संदेश अन्य 100 लोकांपर्यंत पोहचवण्याचं आवाहन केलंय.


कोण आहेत सोनम वांगचुक
आमिर खानच्या गाजलेल्या ‘थ्री इडियटस’ चित्रपटातील फुंगसुक वांगडु हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारीत आहे. लडाखसारख्या दूर्गम भागात वांगचुक यांनी शिक्षण, विज्ञानासारख्या क्षेत्रात अमुलाग्र बदल केले आहेत. त्यासाठी सोनम वांगचूक यांचा मॅनसेसे पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. पाणी टंचाईवर मात करणारे आइस स्टुपा (ice stupa) साठीही ते प्रसिद्ध आहेत. वांगचुक यांनी 1988 साली इंजिनिअरींगमध्ये पदवी घेतल्यानंतर लडाख सारख्या दुर्गम प्रदेशात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुरु केला.

India China | भारत- चीन वादात अमेरिकेचा हस्तक्षेप राजकीय फायद्यासाठी : परिमल माया सुधाकर