दिल्ली दंगलीप्रकरणी आरोपपत्रात सीताराम येचुरी, योगेंद्र यादव यांचीही नावे
फेब्रुवारी महिन्यात राजधानी दिल्लीत घडलेल्या दंगली प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आपल्या पुरवणी आरोपपत्रात अनेक नेत्यांच्या नावांचा समावेश केला आहे.
![दिल्ली दंगलीप्रकरणी आरोपपत्रात सीताराम येचुरी, योगेंद्र यादव यांचीही नावे Sitaram Yechury, Yogendra Yadav, economist Jayati Ghosh named co-conspirators in Delhi riots case दिल्ली दंगलीप्रकरणी आरोपपत्रात सीताराम येचुरी, योगेंद्र यादव यांचीही नावे](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/13033926/riot.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : फेब्रुवारी महिन्यात राजधानी दिल्लीत घडलेल्या दंगली प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आपल्या पुरवणी आरोपपत्रात अनेक नेत्यांच्या नावांचा समावेश केला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी, स्वराज्य अभियानचे योगेंद्र यादव, प्राध्यापक अपूर्वानंद, डॉक्युमेंटरी फिल्म मेकर राहुल रॉय यांचा आरोपपत्रात समावेश आहे. कटात सहभागी झाल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
दिल्लीत 23 ते 27 फेब्रुवारी दरम्यान ही दंगल उसळली होती. त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यावर होते. पूर्व दिल्लीत नागरिकत्व कायद्यावरून सुरू झालेल्या आंदोलनाने अचानक हिंसक वळण घेतलं होतं. या दंगलीमध्ये जवळपास 53 जणांचा बळी गेला होता. त्यानंतर या दंगलीच्या चौकशीसाठी एक समिती बसवण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्यानंतर सीताराम येचुरी यांनी ही केंद्र सरकारची सूडबुद्धी असल्याचा आरोप केला आहे.
काय आहे प्रकरण?
फेब्रुवारी 2020 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर होते. दिल्लीत ट्रम्प यांचे स्वागत दंगलीने झाले. शाहीनबाग व जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात एनआरसीच्या विरोधात आंदोलन सुरू होते. हे आंदोलनच दंगलीला कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. 23 फेब्रुवारीला दिल्लीत हिंदू-मुसलमानांमध्ये दंगल भडकली. त्याचे पडसाद सहा दिवस होते. ईशान्य दिल्लीतील सोनिया विहार, गोकुळपुरी, जाफराबाद, कबीरनगर, विजय पार्क, मौजपूर, करावल नगर, सिलमपूर आदी भाग बेचिराख झाला. सर्वत्र इमारती, दुकाने, वाहनांचे सांगाडे होते. रस्त्यांवर दगड-विटांचे ढिगारे होते. जिकडे पाहावे तिकडे रक्ताचा सडा होता. या दंगलीत 53 जणांचा बळी गेला. या दंगलीत 434 लोक जखमी झालेत. 2200 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 783 गुन्हे नोंदविले गेले.
2002 Gujarat Riots | 2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट | ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)