एक्स्प्लोर

Shraddha Walkar : श्रद्धा हत्याकांडातील महत्त्वाची गुपितं उलगडणार! आफताबची आज होणार नार्को टेस्ट, 'हे' प्रश्न विचारण्याची शक्यता

Shraddha Murder Case : आज नार्को टेस्ट दरम्यान आफताबकडून 50 हून अधिक प्रश्न विचारले जाऊ शकतात. श्रद्धा हत्याकांड प्रकरणी आज मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.

Shraddha Murder Case : श्रद्धा हत्याकांड प्रकरणी (Shraddha Murder Case) आज मोठे खुलासे होऊ शकतात. आज आरोपी आफताब पूनावालाची (Aftab Poonawala) नार्को टेस्ट होणार असल्याची माहिती मिळत आहे. शुक्रवारी (18 नोव्हेंबर) दिल्लीतील कोर्टाने या संदर्भात निर्देश दिले होते. नार्को टेस्टमध्ये आफताब अमीन पूनावाला याला 50 हून अधिक प्रश्न विचारले जाऊ शकतात. यादरम्यान आफताब, त्याचे करिअर  आणि श्रद्धा याविषयी प्रश्न विचारले जातील. आफताबने श्रद्धा वालकरला का मारले हे लवकरच कळणार आहे. तिच्या शरीराचे तुकडे कुठे फेकले गेले? हत्या का केली? आफताब ड्रग्ज घेतो का? याशिवाय आफताबकडून अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेष म्हणजे खुनाशी संबंधित प्रकरणात सामान्यतः नार्को चाचणी केली जाते, ज्याच्या मदतीने अत्यंत हाय प्रोफाइल किंवा गुंतागुंतीच्या गुन्ह्याच्या तपासात मदत होते. श्रद्धा हत्याकांडातही दिल्ली पोलिसांना अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाल्यानंतर त्याच्या माध्यमातून तपासाला वेग येऊ शकतो. 

श्रद्धा आणि आफताबचे नाते कसे होते? 
सुत्रांच्या माहितीनुसार, नार्को टेस्टमध्ये श्रद्धा आणि आरोपी आफताबसोबतच्या तिच्या नात्याबाबत प्रश्न विचारले जाणार आहेत. दरम्यान, ही हत्या अचानकपणे करण्यात आली की? पूर्ण नियोजन करून? हा प्रश्नही महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच, आफताब श्रद्धाला कसा आणि कधी भेटला? त्याने श्रद्धाची हत्या कशी केली? मृतदेहाच्या तुकड्यांबाबत, शस्त्रे आणि मोबाईल कुठे फेकले? हे प्रश्न नार्को टेस्टमध्येही विचाण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

नार्को चाचणीनंतर 22 रोजी न्यायालयात हजेरी
न्यायालयाच्या आदेशानुसार, फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये आफताबची नार्को चाचणी झाल्यानंतर त्याला 22 नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनावणीदरम्यान पोलीस तपासासाठी आणखी वेळ मागू शकतात, तसेच त्याची पोलीस कोठडी वाढवण्याची विनंतीही कोर्टाला करू शकतात. 

पोलिसांना अजून काय सापडले नाही?
श्रद्धाचे शीर
खुनाचे शस्त्र
रक्ताने माखलेले कपडे
कोणताही प्रत्यक्षदर्शी
घटनेचे कोणतेही व्हिडीओ फुटेज

पोलिसांना आतापर्यंत काय सापडले?
श्रद्धाच्या मृतदेहाचे काही अवशेष आणि हाडे
रेफ्रिजरेटर
श्रद्धा आणि आफताबचे काही कपडे 

नार्को टेस्ट का केली जाते?
नार्को  चाचणी ही एखाद्या हायप्रोफाईल गुन्ह्याच्या तपासात पुराव्याच्या शोधासाठी आरोपीची चौकशी केली जाते. या चाचणी दरम्यान, एक इंजेक्शन आरोपी व्यक्तीला दिले जाते. यानंतर व्यक्ती अर्धवट बेशुद्ध अवस्थेत पोहोचते. अशा परिस्थितीत प्रश्नांची उत्तरे मिळणे सोपे जाते. 

इतर महत्वाच्या बातम्या

Shraddha Murder Case : रागाच्या भरात आफताबने श्रद्धाची हत्या केली, मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या प्लानसाठी घालवली अख्खी रात्र 

महत्त्वाच्या बातम्या

E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळवायचे असतील तर आधी 'ही' तीन कामे करा, अन्यथा...
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळवायचे असतील तर आधी 'ही' तीन कामे करा, अन्यथा...
Exam Reforms Task Force : पेपरफुटी रोखण्यासाठी आता 'आधार' कार्डचे जनक मैदानात, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, हाय-पावर टास्क फोर्सची स्थापना
पेपरफुटी रोखण्यासाठी आता 'आधार' कार्डचे जनक मैदानात, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, हाय-पावर टास्क फोर्सची स्थापना
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Embed widget