एक्स्प्लोर
पद्म पुरस्कारांच्या यादीत यंदा सर्वांना धक्का देणारी नावे
नवी दिल्ली: दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या देशातील सर्वात प्रतिष्ठीत पद्म पुरस्कारमध्ये यंदा अनेक धक्का देणाऱ्या नावांचा समावेश असणार आहे. एबीपी माझाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या यादीत बरीच नावे प्रसिद्धीच्या कधीही झोतात नसली, तरी रिअल लाईफमध्ये ते हिरो आहेत.
या यादीत समावेश असलेल्यांमध्ये 'नायटिंगल ऑफ वोका लिंगा ट्रायब्स'च्या नावाने ओळखले जाणारे सुखरी बीमा गौडा यांचे नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय पश्चिम बंगालमधील संगीतकार इमरत खान यांचेही नाव यादीत असल्याचे सांगितले जात आहे.
याशिवाय ऑलिम्पिकमध्ये उत्तुंग कामगिरी करुन देशाची मान उंचावणाऱ्या पी.व्ही. सिंधू आणि भारतीय क्रिकेट टीमचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून मानला जाणाऱ्या महेंद्र सिंह धोनीलाही पद्म भूषण किंवा पद्म विभूषण या पुरस्काराने गौरविण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ही सर्व माहिती एबीपी माझाच्या सूत्रांनी दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement