एक्स्प्लोर

शिवसैनिकाने दिल्लीत ओवेसींच्या कानशिलात लगावली?

नवी दिल्ली: शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला केलेली मारहाण ताजी असतानाच, तिकडे दिल्लीतच शिवसैनिकाने एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांना मारहाण केल्याचं सांगण्यात येत आहे. गोरख गोपाळ खर्जुल असं या शिवसैनिकाच नाव आहे. गोरख खर्जुल मूळचे नाशिकचे आहेत. गोरख खर्जुल हे नाशिकचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांचे कार्यकर्ते आहेत. ते दिल्लीत संसद भवन बघायला गेले होते. त्यावेळी त्यांना समोरुन येणारे MIM खासदार असदुद्दीन ओवेसी दिसले. शिवसैनिकाने दिल्लीत ओवेसींच्या कानशिलात लगावली? खर्जुल यांनी ओवेसींची भेट घेऊन तुम्ही वादग्रस्त वक्तव्य का करता, असं विचारलं, त्यावेळी ओवेसींनी बाचाबाची केली, असा दावा खर्जुल यांनी केला. "संसदेचं कामकाज पाहायला आलो होतो. पार्किंगमध्ये गाडीची वाट पाहत होतो. त्यावेळी ओवेसी दिसले. ते वादग्रस्त विधान का करतात असं विचारलं. यावर त्यांनी उलटसुलट उत्तर दिलं. त्यामुळे मी त्यांना कानफाडत लगावली. या घटनेचा मला पश्चात्ताप नाही. कोणत्याही कारवाईला सामोरं जायला तयार आहे", असं गोरख खर्जुल यांनी सांगितलं. असदुद्दीन ओवेसी यांचं एबीपी माझाकडे स्पष्टीकरण दरम्यान, याबाबत एबीपी माझाने असदुद्दीन ओवेसी यांच्याशी संपर्क साधला असता, ओवेसी यांनी अशी काही मारहाण झालीच नसल्याचा दावा केला. मी गाडीत बसलो होतो, त्यावेळी बाहेर काहीतरी गडबड सुरु होती. मी त्याकडे दुर्लक्ष केलं. मला या प्रकाराबाबत काही बोलायचं नाही. हे लोक प्रसिद्धीसाठी असे प्रकार करत असतील, असं ओवेसी म्हणाले. कोण आहे गोरख खर्जुल?
  •  गोरख खर्जुल हे नाशिकचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांचे कार्यकर्ते आहेत.
  •  मूळचे देवळालीतील रहिवाशी आहेत.
  • एका शेतकरी कुटुंबात जन्म झाल्याचा दावा गोरख खर्जुल यांनी केला आहे.
  • आपण स्वत:ही शेतीच करत असल्याचं खर्जुल यांनी सांगितलं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

50 लाख रुपयांचं बक्षीस असणाऱ्या माओवाद्याचं आत्मसमर्पण, भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश 
50 लाख रुपयांचं बक्षीस असणाऱ्या माओवाद्याचं आत्मसमर्पण, भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश 
IPL पूर्वी रिंकू सिंगला गुड न्यूज, उत्तर प्रदेश सरकारकडून क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती, किती मिळणार पगार ?
IPL पूर्वी रिंकू सिंगला गुड न्यूज, उत्तर प्रदेश सरकारकडून क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती, किती मिळणार पगार ?
दिलासादायक! घरगुती ग्राहक हेच सर्वोच्च प्राधान्य, दोन मोठ्या जहाजातून भारतात 92000 टन LPG दाखल होणार
दिलासादायक! घरगुती ग्राहक हेच सर्वोच्च प्राधान्य, दोन मोठ्या जहाजातून भारतात 92000 टन LPG दाखल होणार
अफवांकडे लक्ष देऊ नका! पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा तुटवड्यासंदर्भात सरकारकडून महत्वाची माहिती, किती साठा शिल्लक?
अफवांकडे लक्ष देऊ नका! पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा तुटवड्यासंदर्भात सरकारकडून महत्वाची माहिती, किती साठा शिल्लक?

व्हिडीओ

Kokan Hapus Mango : वातावरणाच्या लहरीपणाचा फळांच्या राजाला फटका, उत्पादन घटलं Special Report
Ashok Kharat Case : भोंदू खरातची विहीर, जादूटोण्याचा उपसा Special Report
Devendra Fadnavis On Ajit Pawar : कुणाला सोडणार नाही, मुडदे खोदून काढू, ठणकावून सांगितलं
Rupali Chakankar : कोण म्हणतं हटाव, कोण म्हणतं बचाव? चाकणकरांवर कारवाई होणार? Special Report
Ashok Kharat SSC Fail : गणितात कच्चा, गंडवण्यात पक्का, भोंदू मांत्रिक खरातची कुंडली Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Metro : पुण्यातील पेठांमधील नागरिकांची डोकेदुखी वाढली, बांधकामांसाठी नवीन नियमावली; मेट्रो बोगद्याला भगदाड पडल्याने महापालिका सतर्क
पुण्यातील पेठांमधील नागरिकांची डोकेदुखी वाढली, बांधकामांसाठी नवीन नियमावली; मेट्रो बोगद्याला भगदाड पडल्याने महापालिका सतर्क
राम नवमीच्या उत्सावामुळे पुणे शहरातील वाहतुकींमध्ये बदल; दुपारी 4 ते 10 वाजेपर्यंत काही रस्ते बंद
राम नवमीच्या उत्सावामुळे पुणे शहरातील वाहतुकींमध्ये बदल; दुपारी 4 ते 10 वाजेपर्यंत काही रस्ते बंद
मोठी बातमी ! धनगर आरक्षणासाठी मुंबईत उपोषणास बसलेल्या दीपक बोऱ्हाडेंच्या सासऱ्याने संपवलं जीवन
मोठी बातमी ! धनगर आरक्षणासाठी मुंबईत उपोषणास बसलेल्या दीपक बोऱ्हाडेंच्या सासऱ्याने संपवलं जीवन
Share Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, गुंतवणूकदारांची 8 लाख कोटी रुपयांची कमाई
Share Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, गुंतवणूकदारांची 8 लाख कोटी रुपयांची कमाई
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर शरद पवारांना भेटला; 'साहेबां'कडून लाखोंचा धनादेश, काका पवारांनाही मोठं गिफ्ट
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर शरद पवारांना भेटला; 'साहेबां'कडून लाखोंचा धनादेश, काका पवारांनाही मोठं गिफ्ट
मोठी बातमी! साताऱ्याचे SP तुषार दोशींचं निलंबन मागे; नीलम गोऱ्हेंनी दिलेला आदेश सभापती राम शिंदेंकडून रद्द
मोठी बातमी! साताऱ्याचे SP तुषार दोशींचं निलंबन मागे; नीलम गोऱ्हेंनी दिलेला आदेश सभापती राम शिंदेंकडून रद्द
Pakistan : अमेरिका- इराणमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानवर दुसऱ्याच दिवशी नामुष्की, इराणनं होर्मुझमधून कराचीला जाणारं जहाज परत पाठवलं
अमेरिका- इराणमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानवर दुसऱ्याच दिवशी नामुष्की, इराणनं दणका दिला
Video: अजितदादांचा घातपात असेल तर आकाश-पातळ एक करु, कुणाचा बाप असला तरी खोदून काढू, देवेंद्र फडणवीसांचा रोहित पवारांना शब्द
Video: अजितदादांचा घातपात असेल तर आकाश-पातळ एक करु, कुणाचा बाप असला तरी खोदून काढू, देवेंद्र फडणवीसांचा रोहित पवारांना शब्द
Embed widget