एक्स्प्लोर
Advertisement
राम मंदिराशिवाय भाजपने सत्तेचे स्वप्ने पाहू नये, शिवसेनेचे टीकास्त्र
लखनऊ: आयोध्येतील बाबरी मशिद विध्वंसाच्या घटनेला काल 6 डिसेंबर रोजी 24 वर्षे पूर्ण झाली. या निमित्त उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये मंगळवारी शिवसैनिकांनी हा दिवस शौर्य दिवस म्हणून साजरा केला. यावेळी कारसेवकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पुजा आणि होमहवनही करण्यात आले. तसेच शिवसेना महानगर प्रमुख अभिषेक अग्निहोत्री यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी यावेळी बाईक रॅलीही काढण्यात आली.
यानंतर बोलताना अग्निहोत्री यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ''राम मंदिराची पायाभरणी केल्याशिवाय भाजपने केंद्र आणि उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत येण्याचे स्वप्न पाहू नये, असे टीकास्त्र त्यांनी सोडले. कारण राम मंदिराचा विषय हा कोट्यवधी रामभक्तांच्या श्रद्धेचा तसेच प्रतिष्ठेचा विषय असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना 200 जागा लढवणार
शिवसेना उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये 200 जागा लढवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच निवडणुकीत पक्षाला भरघोस यश मिळाले, तर शिवसेना मंदिर उभारणीसाठी वचनबद्ध असेल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
राम मंदिर उभारुन बहुमताचा आदर करा
केंद्र सरकार अल्पसंख्याकांना जवळ करताना बहुसंख्याक हिंदूंच्या भावनांचा अनादर करत असल्याचे ते म्हणाले. जनतेने भाजपला पूर्ण बहुमताने निवडून दिले आहे. त्यामुळे भाजपने राम मंदिराची उभारणी करुन त्याची परतफेड करावी, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement