Serum Institute : सायरस पूनावाला यांना भारतरत्न द्या, खासदार श्रीकांत शिंदेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी
Cyrus Mistry : सीरम इन्स्टिट्यूटचे सायरस पूनावाला यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे (Shiv Sena MP shrikant shinde) यांनी केली आहे.
Cyrus Mistry : सीरम इन्स्टिट्यूटचे सायरस पूनावाला यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे (Shiv Sena MP shrikant shinde) यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीकांत शिंदे यांनी पत्र लिहून सायरस पूनावाला यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी केली. कोरोना काळात सायरस पूनावाला यांनी केलेल्या कामाची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात यावा, असं शिंदे यांनी आपल्या पत्रात म्हटलेय. सायरस पूनावाला यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही लस बनवणाऱ्या कंपनीची निर्मिती केली. लस बनवणारी ही जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मितीही मोठ्या प्रमाणात झाली.
सायरस पुनावाला हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे वर्गमित्र हेत. सायरस पुनावाला यांनी पुण्यातील हडपसर भागात 1966 साली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली. सायरस पूनावाला यांना शर्यतीच्या घोड्यांमध्ये रस होता. घोड्यांच्या रक्ताचा उपयोग अनेक प्रकारच्या लसी तयार करण्यासाठी केला जातो. त्यातूनच सायरस पूनावाला हे लस निर्मितीच्या व्यवसायात उतरले आणि सीरम इन्स्टिट्यूटचा प्रवास सुरू झाला. सीरम इन्स्टिट्यूटकडून पोलिओ, डायरीया, हिपॅटायटस, स्वाईन फ्लू अशा अनेक आजारांवरील लसींची निर्मिती येथे केली जाते. आज जगभरात वेगवेगळ्या आजारांवरती ज्या लसींचा उपयोग केला जातो त्यापैकी 65 टक्के लसी या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होतात. कोरोनावरील लस तयार करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटचा ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी आणि ॲस्ट्रा झेनेका यांच्या सोबत करार झालाय. कोरोना काळात सीरम इन्स्टिट्यूटकडून देशभरात आणि विदेशातही लसपुरवठा करण्यात आला. याच कामाचा दाखला देत शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी सायरस पूनावाला यांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ठेवला आहे. श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सायर पूनावाला यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live
संबधित बातम्या :
Forbes : मुकेश अंबानी टॉपवर, पूनावालांचीही भरारी! फोर्ब्सकडून 100 श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर
Child Vaccine : खुशखबर! काहीच महिन्यात Serum Institute घेऊन येणार लहान मुलांसाठी लस