एक्स्प्लोर

सरकारच्या एकतर्फी निर्णयाची लाज वाटते : खा. अनंत गीते

नवी दिल्ली: कोणत्याही चौकशीविना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर विमान कंपन्यांनी घातलेली बंदी ही अत्यंत लाजीरवाणी आहे, मोदी सरकारने एकतर्फी निर्णय न घेता, गायकवाडांवरील विमानप्रवासाची बंदी उठवावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार आणि मोदींच्या मंत्रिमंडळात अवजड उद्योग मंत्रीपद सांभाळणारे अनंत गीते यांनी केली. अनंत गीते यांनीही खासदार गायकवाडांची बाजू घेतली. "खासदार रवींद्र गायकवाड हे या सभागृहाचे एक सन्मानित सदस्य आहेत. त्यांच्याबाबतीत प्रवासादरम्यान जी घटना घडली, त्याबाबत दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र कोणत्याही खासदारावर विमानयात्रेदरम्यान काही धक्काबुक्की झाल्यास थेट खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणं हे अयोग्य आहे. हा अन्याय असून, गृहमंत्री राजनाथ सिंह याबाबतीत आपलं म्हणणं मांडतील. याप्रकरणात अद्याप चौकशी सुरु आहे. या चौकशीत सत्य समोर येईल. तुम्ही चौकशी करा आम्ही रोखणार नाही. मात्र कोणत्याही चौकशीशिवाय एअर इंडियासह सर्वच विमान कंपन्यांनी खासदार गायकवाडांच्या प्रवासावर बंदी घालणं, हा कोणता न्याय आहे. हे मोदींच्या नेतृत्त्वातील सरकार जे जनतेचं आहे, ते कोणत्याही चौकशीशिवाय एका खासदारावर बंदी आणतं, ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. याची मला लाज वाटते. मात्र तरीही मी हवाई वाहतूक मंत्र्यांना हात जोडून विनंती करतो की अशाप्रकारचा एकतर्फी निर्णय होऊ नये. खासदार गायकवाडांवरील बंदी हटवण्यात यावी", असं अनंत गीते म्हणाले. मला धक्का दिल्याने मीही धक्का दिला : खा. गायकवाड दरम्यान, खासदार रवींद्र गायकवाड यांनी आज लोकसभेत आपलं निवेदन सादर केलं. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी अरेरावी करत माझा, पंतप्रधानांचा अवमान केला. तसंच त्यानेच मला धक्का दिल्याने मी सुद्धा धक्का दिला. मात्र मी त्याला मारहाण केल्याचं उठवण्यात आलं. चौकशीविनाच माझी मीडिया ट्रायल सुरु आहे. इतकंच नाही तर दिल्ली पोलिसांनी माझ्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र लोकप्रतिनिधीवर चौकशीविना असा गुन्हा दाखल करणं चुकीचं आहे. हा गुन्हा हटवावा आणि विमानप्रवासावरील बंदी उठवावी अशी मागणी खासदार रवींद्र गायकवाड यांनी केली. हवाई वाहतूक मंत्र्यांचं उत्तर दरम्यान, याप्रकरणी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी निवेदन दिलं. खासदार रवींद्र गायकवाड प्रकरणात कायदा आपलं काम करेल. सुरक्षेशी कोणतीही तडजोड होणार नाही, असं अशोक गजपती राजू म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
NCP Sharad Pawar MP Meets Narendra Modi Delhi: देशाच्या राजकारणातील हायव्होल्टेज मिटिंग; सुळे, कोल्हे, लंकेंसह शरद पवारांचे सर्व 8 खासदार नरेंद्र मोदींची भेट घेणार; दिल्लीत काय घडतंय?
देशाच्या राजकारणातील हायव्होल्टेज मिटिंग; सुळे, कोल्हे, लंकेंसह शरद पवारांचे सर्व 8 खासदार नरेंद्र मोदींची भेट घेणार; दिल्लीत काय घडतंय?

व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
IND vs SL : शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
Embed widget