एक्स्प्लोर

विमान कंपन्याविरोधात शिवसेनेकडून हक्कभंग दाखल

नवी दिल्ली/मुंबई: शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर विमानप्रवास बंदी  घालणाऱ्या विमान कंपन्याविरोधात शिवसेनेनं लोकसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. शिवसेनेचे गटनेते आनंदराव अडसूळ यांनी हा प्रस्ताव दाखल केला. या संदर्भात शिवसेना खासदारांची लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांसोबत चर्चा झाली. या चर्चेतून सक्तारात्मक तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जातेय. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असल्याचं नागरी उड्डाणमंत्री अशोक गजपतीराजू यांनी कालच सांगितलं. दरम्यान, आनंदराव अडसूळ यांनी कालच लोकसभेत लक्ष्यवेदी मांडली होती. गायकवाडांवर आणलेली बंदी ही चुकीची असल्याचं मत अडसूळांनी मांडलं. तसंच हा संचार स्वातंत्र्यावर घाला असल्याचंही आडसूळ म्हणाले होते. “एअर इंडियाने खासदारांवर गुन्हा दाखल केला. पण सर्वच विमान कंपन्यांनी बंदी घालणे चुकीचे आहे. संविधानानुसार कुठेही प्रवास करता येतो. बंदी घालणे हे आपल्या हक्कापासून वंचित करणे आहे. माझी अपेक्षा आहे की, सर्व खासदार सहकार्य करतील. अध्यक्षांनी सरकारला निर्देश द्यावे, कपिल शर्मा यांनी मारहाण केली परंतु त्यावर चौकशी सुरु आहे. नागरी उड्डाणमंत्र्यांनी याची दखल घ्यावी. विमान कंपन्यांनी बंदी उठवावी”, असं अडसूळ म्हणाले होते. उड्डाणमंत्री अशोक गजपती राजू यांचं उत्तर “कोणत्याही प्रवाशाला बंदी घालता येत नाही. खासदार हे सुद्धा प्रवासी आहेत. खासदार म्हणून भेदभाव करु शकत नाही सुरक्षेबाबत तडजोड करता येणार नाही”, असं नागरी उड्डाणमंत्री अशोक गजपती राजू म्हणाले. प्रत्यक्षदर्शी एअर होस्टेस गायकवाडांच्या बाजूने “शिवसेना खासदार ड्यूटी मॅनेजरचं गैरवर्तन थांबवण्याचा प्रयत्न करत होते. ड्यूटी मॅनेजरला शिडीवर ढकलण्याचा त्यांचा कोणताही इरादा नव्हता,” असं एअर होस्टेसने सांगितलं. एअर होस्टेसच्या माहितीनुसार, “विमानातील सामान्य प्रवाशांप्रमाणे रवींद्र गायकवाड प्रवास करत होते. विमानाच्या क्रू मेंबरसोबत त्यांचं वर्तन सभ्य होतं. रवींद्र गायकवाड अचानक हिंसक होतील, याची अपेक्षा नव्हती. एअरलाईन्सच्या मॅनेजमेंट अधिकाऱ्याशी त्यांना बोलायचं होतं, म्हणून ते विमानातून उतरत नव्हते. त्यांना जे-क्लासचा बोर्डिंग पास दिला होता आणि त्याबदल्यात त्यांना इकॉनॉमी क्लासमध्ये बसवण्यात आलं होतं. या मार्गावरील विमानात सर्व जागा इकॉनॉमी सीटच होत्या.” रवींद्र गायकवाड काळ्या यादीत पुण्याहून दिल्ली प्रवास करताना इकॉनॉमिक आणि बिझनेस क्लासच्या सीटवरुन खासदार गायकवाड आणि एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यात वाद झाला होता.  यानंतर रवींद्र गायकवाडांनी त्या कर्मचाऱ्याला चप्पलेनं मारहाण केली. यानंतर सर्व विमान कंपन्यांनी मिळून रवींद्र गायकवाड यांना विमान प्रवाशांच्या यादीतून काळ्या यादीत टाकलंय. संबंधित बातम्या

कपिल शर्मावर बंदी नाही, मग खा. गायकवाडांवर का?: खा. अडसूळ

ताई म्हणून सांगते, विमानबंदी प्रश्नी सलोख्याने तोडगा काढा : महाजन

खा. रवींद्र गायकवाड यांचं लेखी स्पष्टीकरण

प्रत्यक्षदर्शी एअर होस्टेस खासदार रवींद्र गायकवाड यांच्या बाजूने मीडियाशी बोलू नका, उद्धव ठाकरेंकडून खा. गायकवाड यांना समज खा. रवींद्र गायकवाड अधिवेशनाला हजेरी लावणार?

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Mithilesh Desai Meets Narendra Modi: शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
Embed widget