Shiv Jayanti Live Updates : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवनेरीवर शिवजन्मोत्सव, राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह
Shivjayanti Live Updates : आज छत्रपती शिवाजी महाराज यांची (Shiv Jayanti) 394 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. शिवजयंती सोहळ्याचे राज्यासह देशातील अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचा...
Yavatmal News : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देशभरात साजरी केली जात आहे. आज शिवजयंती निमित्त यवतमाळमध्ये शिवतीर्थ येथून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. या बाईक रॅलीत शिवभक्तांनी पारंपारीक पद्धतीने भगवे फेटे परिधान करून हातात भगवे ध्वज घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत रॅलीत सहभागी झाले. शहराच्या विविध भागातून ही रॅली काढण्यात आली. शिवजयंती निमित्ताने संपूर्ण शहर भगवेमय झाले होते.
Shiv Jayanti 2024 : हिदुस्थानचे आरध्य दैवत स्वराज्य निर्माते राजे शिवाजी महाराज यांच्या जंयती जल्लोषात साजरी करण्यासाठी अवघी शहापूर नगरी सज्ज झाली आहे. शिवजयंती उत्सव समिती आणि ग्रामस्थ मंडळ आसनगाव यांनी राजांना मानवदंना देण्यासाठी अनोखा उपक्रम हाती घेतला. आसनगावमधील शेकडो महिलांनी राजमाता जिजाबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गर्भसंस्कार भूमी असलेल्या किल्ले माहुली गडाच्या पायथ्याशी पूजन करुन राजमाता आणि राजे शिवाजी महाराजांचा जयघोष केला. यावेळी महिलांसाठी प्रेरणादायी व्याख्यान देखील आयोजित केले होतं.
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील लोणी या गावातील कुणाल विखे या युवा शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये गहू बी उगवून त्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतीकृती साकारलीय. त्यासाठी 10 दिवसांचा कालावधी लागला असून सुरुवातीला शिवरायांची रांगोळी मध्ये प्रतीकृती साकारली त्यांनंतर त्यामध्ये गहू टाकून त्यास पाणी दिले. गहू उगवून येण्यासाठी 7 ते 8 दिवसांचा कालावधी लागलाय. या प्रतिकृतीची लांबी 24 फूट आहे आणि रुंदी 20 फूट आहे. यासाठी 15 किलो गव्हाचा वापर करण्यात आला.
सिंधुदुर्ग : महाराष्ट्रातील छञपती शिवाजी महाराजांचं एकमेव शिवराजेश्वर मंदिरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करणार आली. मालवण मधील सिंधुदुर्ग किल्ल्यावर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेत शिवजयंती साजरी केली, यावेळी मोठ्या संख्येने शिव भक्त उपस्थित होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने पर्यटक देखील सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देत आहेत.
NCP Swarajya Saptah : राष्ट्रवादी काँग्रेसकडून 12 ते 19 फेब्रुवारीपर्यंत राज्यभर स्वराज्य सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम राबवण्यात आले. आज 19 फेब्रुवारी शिव जयंतीनिमित्त या सप्ताहाचा समारोप खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थित रायगड किल्ल्यावर झाला.यावेळी मोठ्या संख्येने शिव प्रेमी गडावर उपस्थित आहेत.
Pune News : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिव महोत्सव सोहळ्याला शरद पवार, सुप्रिया सुळेंची उपस्थिती पाहायला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला शरद पवार पुष्पहार घालून अभिवाजन करतील. यासोबतच आदर्श माता-पिता पुरस्कार तसेच शिव सन्मान पुरस्कारकर्त्यांना शरद पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस येथे सोहळा होत आहे.
PM Modi Tweet on Shiv Jayanti 2024 : पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं आहे. शिवजयंतीनिमित्त मोदींकडून एक्सवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबत त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. दूरदर्शी नेते, निर्भीड योद्धे, संस्कृतीचे रक्षक आणि सुशासनाचे मूर्त रूप , त्यांचे जीवन अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.'
जालना : आज सर्वत्र शिवजयंतीचा मोठा उत्साह सुरू असून अंतरवली सराटीमध्ये देखील शिवजयंतीची जय्यत तयारी होत आहे म्हणून जरांगे उपोषण करत असलेल्या मंडपामध्ये तसेच उपोषणस्थळी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली, शिवजन्म साजरा करण्याची पाळणा देखील सजवण्यात आलाय,
Shiv Jayanti 2024 : रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवजयंतीच्या निमित्ताने आज स्वराज्य सप्ताह समारोप रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे होतोय. यावेळी विविध कार्यकम गडावर सुरु आहेत. यावेळी कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि राष्ट्रवादी पदाधिकारी उपस्थित आहेत.
Shiv Jayanti 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्स सोहळा पार पडला. यावेळी महिलांनी बाळ शिवाजीसाठी खास पाळणा गायला.
Nanded News : रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव निमित्ताने नांदेडमध्ये मोठया उत्साहात रात्री 12 वाजता फटाक्यांची आतषबाजी करत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याला रोषणाई करण्यात आली. फटक्यांची आतषबाजी आणि आकर्षक रोषणाईमुळे परिसर संपूर्ण दुमदुमून गेला.
Delhi Shiv Jayanti 2024 : नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्यानिमित्त ढोलवादन सुरू झाले आहे.
Shiv Jayanti 2024 : हिंगोली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण सगळीकडे बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात पाहत असतो, त्या बॅनरवर राजकीय नेते आणि पुढाऱ्यांचे मोठे फोटो असलेले बॅनर लावण्यात येतात. हिंगोलीत मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची माहिती देणारे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. शिवाजी महाराजांच्या जीवन काळातील महत्त्वाचे बदल महत्त्वाच्या घडामोडींची माहिती देणारे फ्लेक्स शहरात लावण्यात आले आहेत. 10 बाय 20 लांबी रुंदी असलेले एकूण 40 फ्लेक्स हिंगोली शहरातील शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये लावण्यात आले आहेत. या फ्लेक्सच्या माध्यमातून युवा पिढीला शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल माहिती मिळावी या उद्देशाने हे फ्लेक्स लावण्यात आले आहे.
Shiv Jayanti 2024 : जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात आपल्या सर्वांना बांधून ठेवणारं दैवत म्हणजे शिवराय! डब्लिन आयर्लँड येथे प्रथमच महाराष्ट्र मंडळ आयर्लंडने धुमधडाक्यात आणि पारंपारीक पद्धतीने शिवजयंती साजरी केली. महाराजांच्या मुर्तीची ढोल-ताशाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढली गेली. कार्यक्रमाची सुरुवात पाळण्याने झाली. वर्षानुवर्षे परदेशात वास्तव्य असतानाही बाळ गोपाळांनी महाराजांवरचे पोवाडे, कवनं अस्खलित पणे सादर केले. शिवव्याख्यानाने वातावरण शिवमय झाले. सगळ्या मराठी माणसांची नाळ जोडून ठेवणार्या ढोल ताशा पथकाचे सादरीकरण हे विशेष आकर्षणाचा भाग ठरले. महाराष्ट्र मंडळ आर्यलंडने या निमित्ताने संस्कृतीचा मान राखत आपला वेगळेपणा साधताना सुवासानींची ओटी भरली. कार्यक्रमाची सांगता शिवछत्रपतींच्या आरतीने करण्यात आली
कळवण, नाशिक : कळवण तालुका छत्रपती स्मारक समितीतर्फे शिवजन्मोत्सव निमित्ताने मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात नाशिकच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून नेत्रविकार असलेल्या रुग्णांची तपासणी तसेच तुलसी आय हॉस्पिटल येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच आयुष्यमान भारत कार्ड, रक्तदान शिबिर आदींसह समाजोपयोगी उपक्रम शिवजयंतीनिमित्त राबविण्यात येत असल्याची माहिती छ्त्रपती स्मारक समितीचे भूषण पगार यांनी दिली.
नागपूर : शिवजयंती उत्सव संपूर्ण राज्यात साजरा केला जात आहे. नागपूरच्या महाल भागात राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात शिवजयंती उत्सव सुरु झाला. सकाळी 6 वाजता दुग्धाभिषेक सोहळ्याने शिव जयंती उत्सवाला सुरवात झाली. हा सोहळा बघाल शेकडो नागपूरकरांनी देखील गर्दी केली
Junner, Pune News : छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरी नटलेली आहे. गडाच्या पायथ्याला शिवभक्त जमू लागलेत. काही शिवभक्त शिवज्योत घेऊन आपापल्या गावी मार्गस्थ होतायेत.
Shiv Jayanti 2024 : शिवजयंती उत्सवानिमित्त दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदान म्हणजेच शिवाजी पार्क येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास महाराष्ट्राचे मा. राज्यपाल श्री. रमेश बैस, मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, मा. उप मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि मा. उप मुख्यमंत्री श्री. अजित दादा पवार हे सकाळी 9 वाजता पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करणार आहेत.
Solapur Shivjayanti Celebration : डॉल्बी आणि बॅनरचा खर्च टाळून गरीब विद्यार्थिनींची भरली शाळेची फी, शिवजयंती निमित्ताने सोलापुरात शिवसेनेचा अनोखा उपक्रम
सोलापुरात शिवसेनेच्या वतीने अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरा करण्यात येतेय. डॉल्बी आणि डिजिटल बॅनरचा खर्च टाळून शिवसेना सोलापूर उत्तर विभागाच्या पदाधिकऱ्यांनी गरजू मुलींच्या शिक्षणाला मदत केली. सोलापुरात कोणतीही जयंती असली तरी डॉल्बी आणि डिजिटलचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हे टाळण्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात आवाहन केले जात आहे. डॉल्बीमुळे होणारा त्रास आणि डिजिटल बॅनरवर होणारा खर्च लक्षात घेता शिवसेना उत्तरं विभागाने विचारांची शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला.
छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर सरस्वती विद्यामंदिर या शाळेला 55 हजार रुपयांची देणगी दिली. ज्या विद्यार्थिनींनी शाळेची फी भरलेली नाही किंवा अर्धवट फी भरली आहे अशा विद्यार्थिनींची फी या रकमेतून करण्यात यावी अशी विनंती शिवसेनेतर्फे शाळेला करण्यात आली. " छत्रपती शिवरायांची जयंती ही विचारांनी साजरी व्हावी आमचा उद्देश आहे. त्यामुळे यंदा डॉल्बी आणि बॅनरचा खर्च टाळून आणि 55 हजार रुपयांची देणगी शाळेला दिली आहे. भविष्यात ही देणगी पाच लाख रुपयांपर्यंत कशी घेऊन जाता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सोलापुरातील इतरही मंडळांनी डॉल्बी बॅनरचा खर्च टाळून गरजवंतांना मदत करावी " असे आवाहन शिवसेना उत्तरचे अध्यक्ष महेश धाराशिवकर यांनी केले. त्यांनी या केलेल्या कार्याचे संपूर्ण सोलापुरात कौतुक होत आहे.
Shiv Janati Celebration 2024 : किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त शासकीय जयंती सोहळा पार पडणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
पार्श्वभूमी
Shiv Jayant Celebration Live Updates : आज तारखेनुसार, छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंती एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. या दिवशी अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचे आयोजन केले जाते. यावर्षी, छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. शिवजयंती सोहळ्याचे राज्यासह देशातील अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचा...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -