एक्स्प्लोर
Solar Eclipse 2020: शतकातील दुसरं सर्वात दुर्मिळ सूर्यग्रहण आज, जाणून घ्या कसं असेल हे सूर्यग्रहण
आज कंकणाकृती सूर्यग्रहण (solar eclipse 2020) होणार आहे. भारतात अनेक ठिकाणी लोकांना या सूर्यग्रहणाचं दर्शन होणार आहे. कसं असेल हे सूर्यग्रहण, कुठं दिसणार ग्रहण, ग्रहण पाहताना नेमकी काय काळजी घ्यावी, यासंदर्भात जाणून घ्या.
नवी दिल्ली: आजचा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस. सोबतच आज कंकणाकृती सूर्यग्रहण होणार आहे. भारतात अनेक ठिकाणी लोकांना या सूर्यग्रहणाचं दर्शन होणार आहे. यावेळी अद्भुत असं रिंग ऑफ फायर लोकं पाहू शकतील. देशातील बहुतांश भागात मात्र सूर्यग्रहण खंडग्रास पद्धतीनं दिसेल. चंद्रग्रहणाप्रमाणेच सूर्यग्रहण देखील उघड्या डोळ्यांनी पाहू नये, असं आवाहन केलं जात आहे. हे पाहण्यासाठी विविध उपकरणांचा वापर करावा, असं सांगण्यात येत आहे. सांगितलं जात आहे की, आजचं सूर्यग्रहण हे खूप वेगळ्या पद्धतीचं आहे.
कधी दिसणार सूर्यग्रहण
21 जून म्हणजे आज हे ग्रहण जागतिक पातळीवर हे ग्रहण सकाळी 9 वाजून 15 मिनिटांपासून सुरू होणार असून, 3 वाजून 3 मिनिटांनी ते संपेल. दुपारी 12 ते 12.30 दरम्यान या ग्रहणाची तीव्रता अधिक असेल. सूर्यग्रहण कंकणाकृती प्रकारात दिसेल. हे ग्रहण वलयाकार असेल. या ग्रहणात सूर्याचा 99 टक्के भाग झाकला जाईल. देशात काही ठिकाणी सूर्यग्रहणामुळं दिवसाच अंधार पडणार आहे. हे ग्रहण जवळपास सहा तासांच आहे. छह घंटे लंबा होगा. इतने लंबे वक्त तक चलने के कारण ही इस ग्रहण की चर्चा पूरी दुनिया में हो रही है.
नेमकं कशामुळं होतं ग्रहण?
शास्त्रज्ञांच्या मते, सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र आला की, सूर्यग्रहण घडते. त्यामुळे सूर्याचा संपूर्ण प्रकाश पृथ्वीवर पोहोचत नाही. जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्राच्या मागे जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात. जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याच्या प्रकाशाला झाकून टाकतो तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळते, असं शास्त्रज्ञ सांगतात.
कुठं दिसणार ग्रहण
हे ग्रहण भारत, नेपाळ, पाकिस्तान, यूएई, इथोपिया आणि कांगो मध्ये दिसेल. भारतात हरियाणा, उत्तराखंड आणि राजस्थानच्या काही भागात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसेल. तर जयपुर, दिल्ली, चंडीगड, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई, शिमला आणि लखनौ सारख्या शहरात काही प्रमाणात हे ग्रहण दिसणार आहे.
सूर्यग्रहणा संबंधित महत्वाच्या गोष्टी
21 जूननंतर पुढील सूर्यग्रहण यावर्षी 14 किंवा 15 डिसेंबरला होईल, मात्र हे ग्रहण भारतात दिसणार नाही. शास्त्रज्ञांच्या मते, एका वर्षात एकूण पाच सूर्यग्रहणं देखील होऊ शकतात. पूर्ण सूर्यग्रहणात सूर्य जवळपास 90 टक्के झाकला जातो, मात्र हे फार दुर्मिळ असतं. हे केवळ 18 महिन्यांमधून एकदा होतं. पूर्ण सूर्यग्रहण उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवरुन पाहिलं जाऊ शकत नाही.
सूर्यग्रहण पाहताना ही काळजी नक्की घ्या
सूर्यग्रहण पाहताना उघड्या डोळ्यांनी कधी पाहू नये. नासाच्या मते हे दुर्मिळ सूर्यग्रहण पाहण्यासाठी सोलर फिल्टर ग्लासयुक्त चश्मे घाला. एक्स-रे शीट किंवा साधारण चश्मा घालून हे ग्रहण पाहू नका. यामुळं आपल्या डोळ्यांना नुकसान होऊ शकतं. ग्रहणादरम्यान ड्रायव्हिंग किंवा रायडिंग करु नये. लहान बाळांनी सूर्यग्रहण पाहू नये.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement