एक्स्प्लोर
हिमाचल प्रदेशमध्ये बस दरीत कोसळून 27 मुलांसह 29 जणांचा मृत्यू
हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यातील चेली गावाजवळ तब्बल 200 फूट दरीत स्कूल बस कोसळून 29 जणांचा मृत्यू झाल्याचं धक्कादायक वृत्त नुकतंच समोर आलं आहे. मृतांमध्ये तब्बल 27 मुलं आणि इतर दोघांचा समावेश आहे.
कांगडा (हिमाचल प्रदेश) : हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यातील चेली गावाजवळ तब्बल 200 फूट दरीत स्कूल बस कोसळून 29 जणांचा मृत्यू झाल्याचं धक्कादायक वृत्त नुकतंच समोर आलं आहे. मृतांमध्ये तब्बल 27 मुलं आणि इतर दोघांचा समावेश आहे. तर 10 मुलं जखमी असल्याचंही प्राथमिक वृत्त समजतं आहे.
बजीर राम सिंह पठानिया मेमोरियल स्कूलच्या या बसमध्ये एकूण 40 मुलं होती. यापैकी तब्बल 27 मुलांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. सध्या एनडीआरएफची एक टीम घटनास्थळी पोहचली असून जखमी मुलांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. शाळेतून मुलांना घरी सोडण्यासाठी जात असताना ही बस थेट दरीत कोसळली. या अपघातामुळे मुलांच्या पालकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बसचा वेग जास्त असल्याने चालकाचं त्यावरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट दरीत कोसळली अशी प्राथमिक माहितीही समजते आहे.
दरम्यान, याप्रकरणी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या अपघाताप्रकरणी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement