एक्स्प्लोर

मराठा आरक्षण स्थगितीवर आज सुनावणी, तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोरील सुनावणीवर सरकारचा आक्षेप

मराठा आरक्षण प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतरची ही पहिली सुनावणी आहे.ज्या खंडपीठाने आरक्षणाला स्थगिती दिली त्याच तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे आजची सुनावणी होणार आहे. परंतु या खंडपीठासमोरील सुनावणीवर सरकारने आक्षेप नोंदवला आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील बनलेल्या मराठा आरक्षण प्रकरणावर आज (27 ऑक्टोबर) सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतरची ही पहिली सुनावणी आहे. त्यामुळे या सुनावणीत काय होतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

आरक्षणाला स्थगिती देताना हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे देण्यात आलं होतं. परंतु आजची सुनावणी ज्या खंडपीठाने स्थगिती दिली, त्याच नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे होत आहे. प्रकरण एकदा मोठ्या खंडपीठाकडे गेलेले असताना ते पुन्हा तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे लागणं हे काहीसं आश्चर्यकारक असल्याची प्रतिक्रिया या प्रकरणाशी संबंधित काही वकिलांनी दिली. आरक्षणावरची स्थगिती उठवणं हे सरकारसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा त्याच खंडपीठापुढे हे प्रकरण लागल्याने सरकारची अडचण होईल का अशी चर्चा सुरु होती. त्यामुळे सरकारची आज कोर्टातली रणनीती काय असणार याची उत्सुकता होती.

तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोरील सुनावणी मान्य नाही : अशोक चव्हाण या प्रकरणाची सुनावणी आता तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे नको तर आपणच दिलेल्या आदेशानुसार पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर व्हावी, अशी मागणी सरकार आजच्या सुनावणीत करणार आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही भूमिका स्पष्ट केलेली आहे. "या प्रकरणाची सुनावणी त्याच खंडपीठासमोर होणं हे आम्हाला मान्य नाही. घटनापीठाकडे हा विषय गेला आहे. त्यामुळे तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर युक्तिवाद न होता तो पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे व्हावा ही आमची मागणी आहे," असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं. तर मराठा आरक्षण ही सरकारचीच जबाबदारी आहे, असं उत्तर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अशोक चव्हाण यांना दिलं आहे. त्यामुळे आज खंडपीठ त्याबाबत काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल.

9 सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाला स्थगिती सुप्रीम कोर्टाने 9 सप्टेंबरला मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती. तसंच हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्याचाही आदेश दिला होता. या निर्णयामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला. त्यानंतर राज्यात या मुद्द्यावरुन राजकीय वादळ उठलं. त्यानंतर ही स्थगिती उठवण्यासाठी याचिकाकर्ते विनोद पाटील आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या स्थगिती उठवण्याबाबत आज काही निर्णय होतोय का? खंडपीठ यावर काय भूमिका घेतं? हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

संबंधित बातम्या

मराठा आरक्षणावर स्थगितीनंतरची पहिली सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय असणार सरकारची रणनीती?

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या कामाविषयी समाधानी : संभाजीराजे छत्रपती

मराठा आरक्षणावर स्थगितीनंतर सुप्रीम कोर्टात पहिली सुनावणी 27 ऑक्टोबरला, स्थगिती उठणार का?

मराठा आरक्षणासंदर्भात उद्या होणारी सुनावणी अमान्य, आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांचं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : 'आता हवेत उडणारी बस आणणार'; E20 नंतर काय आहे गडकरींचा प्लॅन? स्वतः सांगितलं
'आता हवेत उडणारी बस आणणार'; E20 नंतर काय आहे गडकरींचा प्लॅन? स्वतः सांगितलं
Aamir Khan Controversy : 'जो आमीर खानला संपवेल, त्याला 5 कोटी देणार'; जगद्गुरु परमहंस आचार्यांचे वादग्रस्त वक्तव्य, नितेश राणेंच्या भूमिकेचं समर्थन
'जो आमीर खानला संपवेल, त्याला 5 कोटी देणार'; जगद्गुरु परमहंस आचार्यांचे वादग्रस्त वक्तव्य, नितेश राणेंच्या भूमिकेचं समर्थन
एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर कॅबिनेट मंत्र्यांची बैठक; मंत्रिमंडळ विस्तारात खांदेपालट होणार, नव्या चेहऱ्यांना संधी?
एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर कॅबिनेट मंत्र्यांची बैठक; मंत्रिमंडळ विस्तारात खांदेपालट होणार, नव्या चेहऱ्यांना संधी?
Amit Shah And Eknath Shinde Meets: ठाकरेंचे 6 खासदार फुटले, पण शिंदे गटाला एक भीती; एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा, अमित शाह यांना भेटणार!
ठाकरेंचे 6 खासदार फुटले, पण शिंदे गटाला एक भीती; एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा, अमित शाह यांना भेटणार!

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
MLWF : जून महिन्याच्या पगारात 25  रुपयांची कपात, जूनच्या पगारातून कपात झालेली रक्कम कुठे जमा होते? नेमके काय फायदे मिळतात?
जूनच्या पगारातून कपात झालेले 25 रुपये कुठे जमा होतात? नेमके काय फायदे मिळतात?
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
IND vs ENG : बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, पहिल्या वनडेत टीम इंडियाची दमदार कामगिरी
बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, टीम इंडियाची दमदार कामगिरी
Chhatrapati Sambhajinagar : बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
SIR Mumbai Crime: घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
Embed widget