YouTube वरील अश्लील जाहिरातीमुळे नापास झालो, 75 लाखांची भरपाईची द्या, पोलीस भरतीची तयारी करणारा विद्यार्थी कोर्टात
YouTube Video Advertisement: युट्युबवरील अश्लील जाहिरातीमुळे पोलीस भरतीच्या परिक्षेत नापास झाल्याचा दावा एका विद्यार्थ्यानं केला आहे.
Supreme Court: युट्युबवरील अश्लील जाहिरातीमुळे (YouTube Video Advertisement) पोलीस भरतीच्या परिक्षेत नापास झाल्याचा दावा एका विद्यार्थ्यानं केला आहे. या विद्यार्थ्यानं गुगलकडे 75 लाख रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केली. यासाठी हा विद्यार्थी चक्क सुप्रीम कोर्टात पोहचला होता. या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं विद्यार्थ्याला चांगलेच झापंल असून कोर्टाचा वेळ वाया घालवला म्हणून दंडही केला आहे.
मध्य प्रदेशमधील एका तरुणाने गुगल विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्याच्या मते पोलीस भरतीची तयारी करताना येणाऱ्या अश्लील जाहिरातीमुळे (YouTube Video Advertisement) लक्ष विचलीत झालं. त्यामुळे परिक्षेत नापास झालो. मला 75 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, असे याचिकाकर्त्या विद्यार्थ्यानं कोर्टात दावा केला होता.
याचिकाकर्त्याचा कोर्टात दावा काय?
मध्य प्रदेशमधील पन्ना येथे राहणाऱ्या आनंद किशोर चौधरी याने सुप्रीम कोर्टात याचिका केली होती. त्यानं आपल्या याचिकेत म्हटले की, पोलीस भरती आणि राज्य सेवा परिक्षेची तयारी करत होतो. त्यासाठी युट्युबचा वापर करत होता. पण युट्युबवर वारंवार अश्लील जाहिराती (YouTube Video Advertisement) येत होत्या. त्यामुळे लक्ष विचलीत झालं अन् परिक्षेत नापास झालो. त्यामुळे गुगल इंडियानं 75 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी.
कोर्टात काय झालं?
आनंद चौधरी याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे न्यायमुर्ती संजय किशन कौल आणि अभय एस ओका यांनी नाराजी व्यक्त केली. न्यायमुर्ती कौल म्हणाले की, 'तुम्हाला जाहिराती पाहायच्या नसतील तर पाहू नका. याप्रकराच्या याचिका करुन कोर्टाचा वेळ वाया घालवू नका. कोर्टाचा वेळ वाया घालवला म्हणून तुम्हाला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येत आहे'
याचिकाकर्त्याला 25 हजारांचा दंड -
सुप्रीम कोर्टातील न्यायमुर्तीची नाराजी पाहून याचिकाकर्त्याने माफीची मागणी केली. यावर कौल म्हणाले की, 'दंडाची रक्कम कमी करत आहोत. पण माफी मिळणार नाही.' कोर्टानं याचिकाकर्त्याला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला. यावर याचिकाकर्त्यानं बेरोजगार असल्याचं कोर्टाला सांगितलं. त्यावर आम्ही कोर्टानं आम्ही कोणत्याही परिस्थितीत दंड वसूल करु, असे कोर्टानं याचिकाकर्त्याला सांगितलं.
Obscene YouTube Ads Distracted, Failed In Exams, Says Petitioner Seeking Compensation; Supreme Court Dismisses Plea With Costs #SupremeCourtOfIndia @awstika https://t.co/St1MXlt82C
— Live Law (@LiveLawIndia) December 9, 2022
आणखी वाचा:
Love Jihad Law : महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्याची राज्य सरकारची तयारी?