SBI PO Interview Letter 2022: एसबीआयमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या भरतीच्या संधींच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. एसबीआयमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी भरती निघाली आहे. एसबीआयतर्फे प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या भरतीसाठी बँकेकडून मुलाखत पत्र जारी करण्यात आलंय. ज्या उमेदवारांनी मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली आहे ते एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन मुलाखत पत्र डाउनलोड करू शकतात.


एसबीआयकडून प्रोबशनरी ऑफिसर पदासाठी 2 जानेवारी 2022 रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल 25 जानेवारी घोषीत करण्यात आला होता. आता उतीर्ण झालेल्या उमेदवारांना आता तिसऱ्या फेरीसाठी म्हणजेच मुलाखतीसाठी हजर राहावं लागणार आहे. यानंतर फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये अंतिम निकाल जाहीर केला जाऊ शकतो. एकूण 2 हजार 56 पदांची भरती केली जणार आहे. 


उमेदवारांनी प्रवेशपत्रासोबत संबंधित कागदपत्रांची मूळ फोटो कॉपी आणि वैध ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. प्रवेशपत्रावर मुलाखतीची तारीख, वेळ आणि ठिकाण देण्यात आलंय. प्रवेशपत्र कसं डाऊनलोड करायचं? यासाठी खालील माहिती महत्वाची आहे. 


मुलाखत पत्र कसं डाउनलोड करावं?
1)मुलाखतीचे पत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट sbi.co.in किंवा ibpsonline.ibps.in वर जा.
2)वेबसाइटच्या होम पेजवर चालू उघडण्याच्या लिंकवर जा.
3)यानंतर प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या रिक्रूटमेंटच्या लिंकवर जा. 
4) त्यानंतर मुलाखत कॉल लेटरच्या लिंकवर जा.
5) आता नोंदणी क्रमांक/ रोल नंबर आणि पासवर्ड/ डीओबीच्या लिंकवर गेल्यानंतर मुलाखतीचे पत्र दिसेल.
6) मुलाखत पत्र डाउनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी प्रिंट आउट काढून घ्यावी.


भारतीय स्टेट बँकनं जाहीर केलेल्या या रिक्त पदांद्वारे एकूण 2056 पदांची भरती केली जाईल. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी 810 जागा ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय ओबीसीसाठी 540, एससीसाठी 300 आणि एसटीसाठी 150 जागा भरती होणार आहेत. त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी (EWS) 200 जागा ठेवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर अनुशेषातील 56 पदांची भरती करण्यात येणार आहे.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha