Weather Report : राज्यातील थंडीची लाट कायम आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, उत्तर भारतात गारांचा आणि वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढचे दोन दिवस बंगालच्या खाडीतून बाष्पीकृत हवेच्या प्रभावामुळे पूर्व भारतात पावसाची शक्यता आहे. या परिस्थितीचा परिणाम विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात जाणवेल. मुंबईसह कोकणातही थंडी वाढली आहे. या भागात काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, देशात 3 फेब्रुवारीला दिल्लीसह उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. 


हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, गुरुवारी दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील. त्यामुळे राजधानीत दिवसभर थंडी आणखी वाढेल. गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण असेल. पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने म्हटले आहे की, देशात काही ठिकाणी 3 फेब्रुवारीपासून ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस थंडीपासून दिलासा मिळणार नसल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडीचा जोर कमी होईल. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून थंडीची लाट सुरू आहे.


दरम्यान, सध्या तरी महाराष्ट्रामध्ये पुढील आठवड्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, पाच दिवस कडाक्याची थंडी सोसल्यानंतर नागपूरकरांना गेल्या दोन दिवसात काहीसा दिलासा मिळाला आहे. सरासरी तापमान अद्यापही 2.8 अंशाने खाली असले तरी, थंडीचा तडाखा कमी झाला आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :




LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha