​IOCL Apprentice Recruitment 2022 :  इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड, IOCL ने अप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवार (Applicant) IOCL ची अधिकृत वेबसाईट (Official Site) iocl.com च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज (Online Apply) करु शकतात. या जागांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) 15 फेब्रुवारी, 2022 पर्यंत आहे. या प्रक्रियेअंतर्गत एकूण 570 जागांसाठी भरती होणार आहे. पश्चिम भारतातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश (गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा आणि दादरा आणि नगर हवेली) मध्ये लागू असलेल्या भरतीसाठी विहित टक्केवारीनुसार आरक्षण लागू होईल. उमेदवारांना शेवटच्या तारखेची प्रतीक्षा न करण्याचा सल्ला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वतीनं देण्यात आला आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असाल तर संधी सोडू नका, त्वरित अर्ज करा. 


पात्रतेचे निकष


ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, ते येथे उपलब्ध तपशीलवार अधिसूचनेद्वारे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासू शकतात. त्यानुसार अर्ज करु शकतात. 


निवड प्रक्रिया 


अधिसूचनेनुसार, (Notification) निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षेच्या ऑनलाइन पद्धतीचा समावेश असेल. ऑनलाइन लेखी परीक्षेत 100 प्रश्न असतील आणि 90 मिनिटांचा कालावधी असेल. त्यात प्रामुख्यानं वस्तुनिष्ठ प्रकारचे एकाधिक निवड प्रश्न (MCQ) असतील. प्रश्न द्विभाषिक म्हणजे इंग्रजी आणि हिंदीमध्ये असतील.


इतर तपशील


अधिसूचनेनुसार,  (According to Notification) प्रशिक्षणाचा कालावधी 12 महिन्यांचा असेल. उमेदवारांना सल्ला देण्यात येतो की, ते रीजनल डायरेक्टरेट ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग (RDAT) कडे ट्रेड अप्रेंटिस म्हणून ऑनलाइन नोंदणी करू शकतात. तसेच, बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग (BOAT) मध्ये तंत्रज्ञ शिकाऊ म्हणून स्वतःची नोंदणी (Online Registration) करू शकतात.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 




दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI