RCF Apprentice Recruitment : रेल कोच फॅक्टरी (Rail Coach Factory) द्वारे अप्रेंटिस पदांसाठी (Apprentice Posts) अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार (Applicant) आरसीएफ (RCF) च्या अधिकृत वेबसाईटवर (Official Site) rcf.indianrailways.gov.in अर्ज करु शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख उद्या म्हणजेच 31 जानेवारी आहे. ज्या पात्र उमेदवारांनी या पदांसाठी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांनी त्वरित अर्ज करावा. या भरती मोहिमेत 56 पदे भरली जाणार आहेत. ऑनलाइन अर्ज सादर करताना, प्रत्येक अर्जदाराला एक नोंदणी क्रमांक (Registration Number) जारी करण्यात येणार आहे. 


येथे रिक्त जागा तपशील :


फिटर : 4 पद 
वेल्डर : 1 पद
मशीनिस्ट : 13 पद
पेंटर : 15 पद
सुतार : 3 पद
मॅकेनिक : 3 पद 
इलेक्ट्रिशियन : 7 पद
इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक : 9 पद
एसी आणि रेफरी, मॅकेनिक : 1 पद
एकूण : 56 पद


आवश्यक पात्रता निकष


अधिसूचनेनुसार, (According to Notification) उमेदवारांनी 10वी इयत्तेची परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेले असावे आणि नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंगने जारी केलेले अधिसूचित ट्रेडमधील राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र देखील असावे. उमेदवाराची वयोमर्यादा 15 ते 24 वर्षे दरम्यान असावी.


निवड प्रक्रिया 
 
उमेदवाराची (Applicant)  निवड अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांच्या तयार केलेल्या गुणवत्ता यादीवर आधारित असेल. ज्या ट्रेडमध्ये अॅप्रेंटिसशिप करायची आहे, त्या ट्रेडमधील मॅट्रिक आणि आयटीआयमधील गुणांच्या टक्केवारीच्या आधारे या उद्देशासाठी गुणवत्ता यादी तयार केली जाईल.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI