Mulayam Singh Yadav blesses Smriti Irani: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. देशाच्या आर्थिक स्थितीचे नेमके चित्र दर्शविणारा आर्थिक पाहणी अहवाल आज संसदेत सादर करण्यात आला. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे काही खास फोटो आणि व्हिडीओ समोर आली आहेत. आज समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आशिर्वाद दिल्याचे पाहायला मिळाले.  मुलायमसिंह संसदेच्या पायऱ्या उतरत असतानाच स्मृती इराणी तिथे आल्या. यावेळी मुलायम यांना पाहताच स्मृती इराणी यांनी त्यांना हात जोडून नमस्कार केला. त्यानंतर मुलायमसिंह यांनीही इराणी यांच्या डोक्यावर हात ठेवत त्यांना आशीर्वाद दिला.


दरम्यान, सध्या पाच राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने उत्तर प्रदेशमध्ये भाजप आणि समाजवादी पार्टी हे दोन्ही पक्ष आमने-सामने आले आहेत. दोन्ही पक्षांनी उत्तर प्रदेशमध्ये जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने तेथील राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच वेगवेगळ्या पक्षांतील दोन नेत्यांचे एकत्र फोटो भारतीय लोकशाही सुंदरता दाखवत असल्याचे दिसून आले.



आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget 2022 ) सुरू झाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं या अधिवेशनाची सुरूवात झाली. यावेळी बोलताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केंद्र सरकारचं कौतुक केलं. "देशात आज 90 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांचा कोरोना लसीचा एक डोस पूर्ण झाला आहे तर 70 टक्के लोकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत.  लसीकरणात देश जगात अव्वल आहे. 'सबका साथ, सबका विकास' हा सरकारचा मंत्र असून सशक्त भारत तयार करण्यामध्ये केंद्राचं महत्वाचं योगदान आहे, असे मत रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दोन्ही सभागृहांना संबोधित केले. यावेळी राष्ट्रपती म्हणाले, "कोरोना महामारीचे हे तिसरे वर्ष असून या काळात भारतातील लोकांचा लोकशाही मूल्यांवरील विश्वास, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठा अधिक वाढल्याचे आपण पाहिले आहे.  भारतात बनवल्या जाणाऱ्या कोरोनाच्या लसी संपूर्ण जगाला महामारीपासून मुक्त करण्यात आणि कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आज देशातील 90 टक्क्यांहून अधिक जेष्ठ नागरिकांना लसीचा एक डोस मिळाला आहे, तर 70 टक्क्यांहून अधिक लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. सरकारने 64 हजार कोटी रुपये खर्च करून सुरू केलेले पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य अभियान हे एक कौतुक करण्यासारखे उदाहरण आहे. ही योजना केवळ सध्याच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करेल असे नाही तर आगामी संकटावेळीही खूप मदत करेल.


महत्त्वाच्या बातम्या: