हैदराबाद: कोरोनाच्या काळात ऑनलाइन वेबसाईटवरुन साहित्य मागवण्याकडे लोकांचा कल वाढल्याचं दिसून येतंय. पण आपण जर पत्ताच योग्य नाही दिला तर डिलिव्हरी करणाऱ्यांची गोची होते. असे अनेक पत्ते मजेशीरही असतात. हैदराबादच्या सलीम लाला या व्यक्तीचा पत्ताही तसाच हैदराबादी स्टाइलचा आहे.
हैदराबादी स्टाइल पत्ता
हैदराबादच्या सलीम लाला नावाच्या एका ग्राहकाने ऑनलाइन वेबसाईटवरुन काही साहित्य मागवले होते. पण ते मागवताना आपला जो पत्ता दिला आहे तो मात्र मजेशीर आहे. संबंधित कंपनीच्या पार्सलवरचा हा पत्ता व्हायरल होताना दिसतोय. त्यामध्ये लिहलंय की '12-24/Z1, पाशा भाईच्या दुकानात या आणि विचारा सलीम लाला कुठे राहतात, थेट घरात आणून सोडतील. चारमिनार, हैदराबाद.'
PHOTO | IAS सुनील केंद्रेकर यांचा साधेपणा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
आता अशा प्रकारचा पत्ता दिला असेल तर तो वाचताना कोणालाही हसू आवरणार नाही हे नक्की. सोशल मीडियात एका व्यक्तीने आपल्या ट्विटर अकाउंटवर हा पत्ता शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहलंय की, 'हैदराबादी स्टाइल पत्ता.' या पत्तावर सोशल मीडियात तूफान चर्चा केली जातेय. यावर अनेक मजेशीर कमेन्टही केल्या जात आहेत.
फ्लिपकार्टचे मजेशीर ट्वीट
अशाच प्रकारचा एक फोटो जुलै 2020 मध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्येही असा मजेशीर पत्ता लिहण्यात आला होता. राजस्थानच्या कोटा येथील उदयवीर शक्तिवात या ग्राहकाने चौथ माता मंदिर, शिवपूरा. मंदिराच्या समोर आल्यानंतर फोन करा, मी येईन. असा आपला पत्ता लिहता लिहला होता. हा पत्ता फ्लिपकार्टने आपल्या साईटवर टाकला होता आणि नंतर तो व्हायरल झाला होता.
India vs Australia 3rd Test | ओ काकाsss! रोहितमुळं कापावी लागली अर्धी मिशी; फोटो व्हायरल