एक्स्प्लोर
सचिनच्या सर्वात मोठ्या फॅनला पोलिसांनी पकडलं!

मुझफ्फरपूर : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा फॅन सुधीर कुमारला वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याच्या आरोपात पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. सुधीर कुमार हा बिहारच्या मुझफ्फरपूरचा रहिवासी आहे.
मात्र चौकशीनंतर सुधीर कुमारला सोडण्यात आलं.
मुझफ्फरपूरच्या पोलिस उपअधीक्षक आशिष आनंद यांनी सांगितलं की, "सचिनचा सर्वात मोठा फॅन सुधीर कुमार हेल्मेट न वापरता चेहरा कपड्याने झाकून बाईक चालवत होता. यावेळी वाहतूक पोलिसांनी त्याला नियमांचं उल्लंघन केल्याच्या आरोपात ताब्यात घेतलं. मात्र सुधीरला चौकशीनंतर सोडलं. तर बाईकच्या कागदपत्रांचा तपास सुरु आहे."
"माझ्याकडे हेल्मेट होतं, परंतु डोकं दुखत असल्याने बाईक चालवताना ते घातलं नाही," असं सुधीर कुमारने पत्रकारांना सांगितलं.
सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा फॅन अशी सुधीर कुमारची ओळख आहे. मतदान जागरुकता अभियान, मनरेगाचा प्रचार-प्रसार अशा कार्यक्रमात सुधीरचा समावेश असतो.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























