एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
RTI मध्ये विचारणा, खात्यात15 लाख कधी जमा होणार? PMO चे उत्तर...
एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने (आरटीआय) पंतप्रधान कार्यालयाकडे (पीएमओ) उत्तर मागितलं.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत, देशाबाहेरील काळा पैसा भारतात आला तर प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होतील, असं म्हटलं होतं.
मोदींचं नेमकं हेच वक्तव्य हेरत, एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने (आरटीआय) पंतप्रधान कार्यालयाकडे (पीएमओ) उत्तर मागितलं.
जनतेच्या खात्यात 15 लाख रुपये कोणत्या दिवशी जमा होतील, अशी विचारणा आरटीआयअंतर्गत पीएमओकडे करण्यात आली.
मात्र पंतप्रधान कार्यालयाने केंद्रीय माहिती आयोगाला, आरटीआय अंतर्गत अशी कोणतीच माहिती नाही असं सांगितलं. त्यामुळे याबाबतची माहिती किंवा उत्तर दिलं जाऊ शकत नाही, असं पीएमओने स्पष्ट केलं.
माहिती अधिकार कार्यकर्ते मोहन कुमार शर्मा यांनी 2016 मध्ये नोटाबंदीच्या 18 दिवसानंतर माहिती मागवली होती. यामध्ये त्यांनी मोदींच्या घोषणेप्रमाणे 15 लाख रुपये कधी मिळणार, अशी विचारणा केली होती.
मात्र त्यांना माहिती मिळत नव्हती. मग मोहन कुमार शर्मा यांनी मुख्य माहिती अधिकार आयुक्त आर के माथूर यांच्याकडे तक्रार केली होती.
त्यानंतर मग मोहन कुमार शर्मा यांना सांगण्यात आलं की, त्यांनी विचारलेली माहिती ही माहिती अधिकार कार्यकक्षेत येत नाही. त्यामुळे ती माहिती उपलब्ध नाही.
संबंधित बातम्या
नागरिकांच्या खात्यात 15 लाख कधी, सूचना आयोगाची मोदींना विचारणा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement