Uttar Pradesh Lalitpur News : उत्तर प्रदेशातील ललितपूर (Lalitpur) येथील रेल्वे स्टेशनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये रेल्वे पोलीस दलामधील (RPF) जवानाने एका वृद्ध महिलेचा जीव वाचवताना दिसत आहे. जवानाच्या सतर्कतेमुळे महिलेचा जीव थोडक्यात वाचला आहे.
या व्हिडीओमध्ये एक वृद्ध महिला रेल्वे ट्रॅक ओलांडून प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तेवढ्यात तिथल्या प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या एका आरपीएफ (RPF) जवानाची नजर मागून येणाऱ्या भरधाव गाडीवर पडते. जवानाने आधी आवाज देऊन महिलेला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, गाडीचा वेग जास्त असल्या कारणाने जवानाने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रेल्वेरूळावर अडकलेल्या महिलेचा जीव वाचवला.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होतोय. व्हिडीओ पाहून अक्षरश: अंगावर काटा येतो.
या संदर्भात मध्य रेल्वे, मुंबईचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (CPRO) शिवाजी सुतार (Shivaji Sutar) यांनी ट्वीट केले आहे की, धैर्यपूर्ण पाऊल, ललितपूर रेल्वे स्थानकावर, हेड कॉन्स्टेबल कमलेश कुमार दुबे यांनी एका वृद्ध महिलेचा जीव वाचविण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला.' तसेच एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी फूट ओव्हर ब्रिजचा वापर करावा. अशी विनंती भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने नागरिकांना केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Congress Satyagraha: अग्निपथ योजनेविरोधात काँग्रेसचा आज 'सत्याग्रह', राहुल गांधी उपस्थित राहण्याची शक्यता
- नाशिकमध्ये काँग्रेसचे 'अग्निपथ' योजनेविरोधात आंदोलन, पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड
- Agnipath Scheme Meeting: लष्कराच्या तिन्ही दलांची आज एकत्रित पत्रकार परिषद, काय घोषणा होणार याकडं सर्वाचं लक्ष